*नंदुरबार येथील श्रॉफ जुनिअर कॉलेज व एच एम चॅरिटेबल लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथील श्रॉफ जुनिअर कॉलेज व एच एम चॅरिटेबल लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली*
*नंदुरबार येथील श्रॉफ जुनिअर कॉलेज व एच एम चॅरिटेबल लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्रीमती हि.गो. श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात एच. एम चॅरिटेबल लॅबोरेटरी यांच्या सौजन्याने रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन गट शिक्षण अधिकारी जयंत चौरे, प्राचार्य सुषमा शाह, शिक्षण विस्तार अधिकारी एस. एन. पाटील व एच.एम.मेमोरियलचे संचालक कैलास मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. गटशिक्षणाधिकारी जयंत चौरे म्हणाले की रक्तगट तपासणे अत्यावश्यक आहे कारण आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित रक्त संक्रमण करण्यासाठी, अवयव प्रत्यारोपण करताना आणि गर्भधारणेदरम्यान आई व बाळ यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी याची गरज लागते, कारण चुकीच्या रक्तगटाचे रक्त दिल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. कार्यक्रमाचे संयोजन कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा. प्रशांत बागुल यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गणेश पाटील यांनी केले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. नितीन देवरे, प्रा. विमलेश बागुल, प्रा नीलिमा पाटील, प्रा. नेहा पाटील, प्रा. कमलेश अहिरे, प्रा. विद्या थोरात, प्रा. डॉ. युवराज पाटील, प्रा. डॉ. दिनेश देवरे, प्रा. राजेंद्र माळी, प्रा. नरेंद्र गिरासे प्रा.डॉ. जयश्री पाटील, प्रा. प्रतिभा पाटील,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.