*अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्याविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल 40 लाख 38 हजार 560 रुपये किमतीचे 232 पेटयांचा मुद्देमाल वाहनांसह जप्त, 02 आरोपी ताब्यात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्याविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल 40 लाख 38 हजार 560 रुपये किमतीचे 232 पेटयांचा मुद्देमाल वाहनांसह जप्त, 02 आरोपी ताब्यात*
*अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्याविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल 40 लाख 38 हजार 560 रुपये किमतीचे 232 पेटयांचा मुद्देमाल वाहनांसह जप्त, 02 आरोपी ताब्यात*
नंदुरबार(प्रतिनिधी):-स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना 24 डिसेंबर 2025 रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, बऱ्हाणपूर- अंकलेश्वर मार्गाने गुजरात राज्यात एका पांढऱ्या रंगाच्या विना नंबरची टाटा कंपनीचा 407 मॉडेल हया वाहनामध्ये विनापास विदेशी दारुची वाहतूक होणार असुन त्या वाहनाला पांढऱ्या रंगाची सुजूकी व्हॅगनर पायलटींग करणार असलेबाबत खात्रीशिर माहिती मिळाली. सदर माहितीचे आधारे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकास बातमीची खात्री करुन कारवाई करणेकामी सांगितले. मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा पथक हे स्थानिक पोलीसांचे सोबत अंकलेश्वर - बुऱ्हाणपूर रस्त्यावरील मोरांबा फाट्यावर येवून थांबले असता रात्रीचे वेळेस एक चारचाकी पांढऱ्या रंगाची वॅगनर वाहन व तिचे मागे पांढऱ्या रंगाची विनानंबरची 407 मॉडेल वाहन असे येतांना दिसले. सदर वाहनास बॅटरीचा इशारा देऊन थांबविण्याचा प्रयत्न करता सदर वाहने थोड्या अंतरावर जाऊन थांबले. व त्यातून काही इसमांनी पोलीस आल्याचे पाहून तेथुन पळ काढला. ताब्यात घेण्यात आलेल्या वॅगनर वाहन क्रमांक MP 09 ZB 3104 वरील वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव इरफान असलम खान, वय 38 वर्षे, रा. खलवाडी मोहल्ला, सेंधवा, ता. सेंधवा जि. बडवाणी, मध्यप्रदेश असे सांगितले. त्याचप्रमाणे विना क्रमांकाचे 407 मॉडेल चारचाकी वाहनावरील इसमास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव राकेश इंदारामजी मेघवाल, वय- 30 वर्षे, रा. बोराळी, ता. शिरपूर जि.धुळे असे सांगीतले. सदर वाहनांची तपासणी करता त्यामध्ये एकुण 23 लाख 38 हजार 560 रुपये किमतीच्या विदेशी दारुच्या प्लॅस्टीकच्या बाटल्यांचे 58 खाकी रंगाचे खोके, एका खोक्यात 4 पेटया अशा एकुण 232 पेटया व दोन वाहने असा एकुण 40 लाख 38 हजार 560 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. त्याअन्वये वरील इसमांविरुध्द अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे महा. दारुबंदी कायदा कलम 65 (ई), 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, पोहेकॉ दादाभाई मासुळ, महेंद्र नगराळे, मोहन ढमढेरे, पोना/चेतन साळवे, पोकॉ शोएब शेख अशांनी केली आहे.



