*कालिकाई राखणदेव क्रीडा मंडळ तारळ धुमाळवाडी आयोजित कै. विष्णू भिवा बाईत स्मृती चषक उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कालिकाई राखणदेव क्रीडा मंडळ तारळ धुमाळवाडी आयोजित कै. विष्णू भिवा बाईत स्मृती चषक उत्साहात संपन्न*
*कालिकाई राखणदेव क्रीडा मंडळ तारळ धुमाळवाडी आयोजित कै. विष्णू भिवा बाईत स्मृती चषक उत्साहात संपन्न*
मुंबई(प्रतिनिधी):-कालिकाई राखणदेव क्रीडा मंडळ, तारळ धुमाळवाडी ता. राजापूर आयोजित अध्यक्ष निलेश धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रभाकर बाईत यांच्या सहकार्याने उपरोक्त मंडळाच्या वतीने 21 डिसेंबर 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान दादर येथे कै. विष्णु भिवा बाईत स्मृती चषक 2025 मोठ्या उत्साहात पार पडला या स्पर्धेचे यंदाचे हे 5 वे पर्व होते या स्पर्धेत 16 संघांनी सहभाग घेतला होता स्पर्धेतील सर्व सहभागी संघांना मनापासून धन्यवाद देण्यात आले ही क्रिकेट स्पर्धा कालिकाई यंगस्टार क्रीडा मंडळ वावळे खाजनवाडी यांच्या सहकार्याने उत्तमरित्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या स्पर्धत शिव शक्ती वॉरियर्स गांगो गुरव वाडी सोलगांव संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आणि उपविजेता संघ ठरला तो वाय. सी. सी वाकी विजेत्या आणि उपविजेत्या दोन्ही संघांचे कालिकाई राखणदेव क्रीडा मंडळा कडून अभिनंदन करुन पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज वैभव कोळवणकर आणि उत्कृष्ट फलंदाज देवा वाईम हे ठरले. आपण सर्वांनी आणि मंडळातील सर्व सभासद पदाधिकारी यांनी मंडळाला विशेष सहकार्य केल्याबद्दल कालिकाई राखणदेव क्रीडा मंडळाने आभार मानले आहेत.



