*पी.के.पाटील.माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पी.के.पाटील.माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा*
*पी.के.पाटील.माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील हिरा प्रतिष्ठान संचलित सहकार महर्षी पी. के. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अनिल चौधरी होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी रामानुजन यांचे बालपण, जीवनकार्य तसेच गणितातील योगदान यावर विद्यार्थी यशवर्धन लक्ष्मीकांत चौधरी, रिया अर्जुन बंजारा, पूजा जितेंद्र भोसले, दिव्या उदय चव्हाण, हर्षदा सुभाष अहिरे, कीर्ती ज्ञानेश्वर बोरसे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गणितीय गीताने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते गणित विषयाचे शिक्षक सुधाकर सूर्यवंशी यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग व त्यांच्या गणितातील अद्वितीय कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक अनिल चौधरी यांनी गणिताचे दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी गणिताची भीती न बाळगता अभ्यासपूर्ण दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन केले. राष्ट्रीय गणित दिनानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात लहान व मोठ्या गटात एकूण 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. लहान गटात प्रथम क्रमांक गुंजन रतनलाल गाडी, द्वितीय क्रमांक इशिका जितेश राठोड व अर्चना कैलास पवार, तृतीय क्रमांक गार्गी राकेश मोरे, उत्तेजनार्थ क्रमांक वैभव धनाजी गायकवाड व माही प्रेमचंद चव्हाण यांनी मिळविला. तसेच मोठ्या गटात प्रथम क्रमांक मिताली करणसिंग चव्हाण, रोशनी तेजमल राठोड, द्वितीय क्रमांक पूजा अभय सोनार, पूजा जितेश भोसले, तृतीय क्रमांक नेहा धनराज राठोड, कल्याणी नरेंद्र तांबोळी व उत्तेजनार्थ क्रमांक खुशी पुरुषोत्तम भाट, अक्षता अजित गावित यांना मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वला चौरे यांनी केले. आभार अमोल भदाणे यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



