*नंदुरबार जिल्हास्थरीय अविष्कार संशोधन स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयाचे यश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हास्थरीय अविष्कार संशोधन स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयाचे यश*
*नंदुरबार जिल्हास्थरीय अविष्कार संशोधन स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयाचे यश*
शहादा(प्रतिनिधी):-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आयोजित जिल्हास्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा 2025 रोजी आदिवासी अकॅडेमी नंदुरबार येथे संपन्न झाली. या स्पर्धेत महाविद्यालयांतून एकुण 51 विद्यार्थांनी 41 संशोधन विषयात सहभाग नोंदविला होता. त्यातील १०. 10 संशोधन विषय करिता 16 विदयार्थी व विद्यार्थिनींची निवड झाली आहे. त्यात प्यूअर सायन्ससेस या थिममध्ये कुलकर्णी आकांक्षा संदिप (युजी- पदार्थ विज्ञान), माळी पूजा अनिल व देवरे हर्षदा दिगंबर (युजी- संगणक विज्ञान), बोरसे दिव्या राजेंद्र व कुवर रेणुकादेवी चतुर (पीजी- रसायनशास्त्र), पाटील वैभवी अशोक (युजी- रसायनशास्त्र), मुस्कान बानो जुल्फेकर अली व अन्सारी मसीरा अंजुम मोहिद (युजी- प्राणीशास्त्र), पाटील प्रणाली संजय व चव्हाण राजनंदनी दिपक (युजी- प्राणीशास्त्र), जाधव कामिनी राजू व पाटील सोनाली जगदीश (पीजी- पर्यावरण विज्ञान) व हुम्यानीटीज या थिममध्ये चौधरी प्रिती किशोर (युजी- मराठी), कुवर माधुरी विजय व मराठे वैष्णवी भरत (युजी- अर्थेशास्त्र), ठाकरे रोशनी कृष्ण (युजी- इंग्रजी) या सर्व स्पर्धकांचे चार वेगवेगळ्या स्थरातून विद्यापीठस्थरीय फेज-2 सादरीकरण करीता निवड झालेली आहे. निवड झालेले सर्वे स्पर्धेक 30 डिसेंबर 2025 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे सादरीकरण करतील. या यशस्वी विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रा. डॉ. बी. वाय. बागुल, प्रा. डॉ. ए. व्ही. पाटील, प्रा. डॉ. आर. बी. मराठे, प्रा. डॉ. आर. डी. पाटील, प्रा. एन. एम. साळुंके, प्रा. डॉ. एच. एस. पाटील, प्रा. डॉ. एम. जे. गायकवाड, प्रा. डॉ. एम. आर. आढाव यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयीन अविष्कारचे समन्वयक प्रा. डॉ. बी. वाय. बागुल व प्रा. डॉ. आर. डी. पाटील यांनी काम पाहिले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव, सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या सचिव सौ. वर्षा जाधव, प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय प्रमुख प्रा. डॉ. हिमांशू जाधव, समन्वयक संजय राजपूत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. राठोड यांनी विद्यार्थांचे कौतुक करून सत्कार केला व विद्यापीठस्थरीय अविष्कार स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.



