*के.आर.पब्लिक स्कूलचे डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत घवघवीत यश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के.आर.पब्लिक स्कूलचे डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत घवघवीत यश*
*के.आर.पब्लिक स्कूलचे डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत घवघवीत यश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के. आर. पब्लिक स्कूलने डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा 2025-26 मध्ये नेत्रदीपक यश संपादन करून शैक्षणिक क्षेत्रात आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या प्रतिष्ठेच्या परीक्षेसाठी के. आर. पब्लिक स्कूलमधून इयत्ता सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी इयत्ता सहावीचे 19 व नववीचे 24 विद्यार्थी असे एकूण 43 विद्यार्थी यशस्वीपणे उत्तीर्ण झाले असून इयत्ता सहावीचा वस्तीगृहातील (Hostel) विद्यार्थी समर्थ नंदकुमार भदाणे हा विद्यार्थी दुसऱ्या प्रात्यक्षिक ( प्रॅक्टिकल) परीक्षेसाठी पात्र ठरला आहे, ही शाळेसाठी विशेष अभिमानाची बाब आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे चेअरमन किशोर वाणी, उपाध्यक्ष सिध्दार्थ वाणी व प्राचार्य. डॉ. छाया शर्मा तसेच यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनः पूर्वक अभिनंदन केले असून त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही कौतुक केले आहे. या यशामुळे शाळेचे नाव सर्वत्र उज्वल झाले असून पालकांमधूनही शाळेचे भरभरून कौतुक होत आहे.



