*18 डिसेंबर रोजी होणार अल्पसंख्यांक दिन-शशांक काळे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*18 डिसेंबर रोजी होणार अल्पसंख्यांक दिन-शशांक काळे*
*18 डिसेंबर रोजी होणार अल्पसंख्यांक दिन-शशांक काळे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-अल्पसंख्यांक विकास विभागाच्या निर्देशानुसार,18 डिसेंबर, 2025 रोजी जिल्ह्यात अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करण्याचे निर्देश प्राप्त झाले असून त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अशासकीय समाजसेवी संस्थांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी गट आणि विद्यार्थी यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्याबाबत शिक्षणाणिकारी (प्राथमिक), (माध्यमिक) आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, यांना निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी, शशांक काळे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
अल्पसंख्यांक हक्क दिवसानिमित्त 18 डिसेंबर, 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे विविध स्पर्धांचे बक्षिस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या बक्षिस वितरण कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व अशासकीय समाजसेवा संस्था, अल्पसंख्यांक समाजातील नागरीकांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी, शशांक काळे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



