*वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलीसांची कारवाई मोटार वाहन कायदयान्वये एकूण 67 वाहनचालकांवर कारवाई करत 87000 रुपयांची दंडात्मक कारवाई*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलीसांची कारवाई मोटार वाहन कायदयान्वये एकूण 67 वाहनचालकांवर कारवाई करत 87000 रुपयांची दंडात्मक कारवाई*
*वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलीसांची कारवाई मोटार वाहन कायदयान्वये एकूण 67 वाहनचालकांवर कारवाई करत 87000 रुपयांची दंडात्मक कारवाई*
नंदूरबार(प्रतिनिधी):-वाहन चालवितांना मोबाईल फोनचा वापर केल्याने अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढत असून नागरीकांच्या जिवीतास धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभुमीवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी जिल्हा वाहतूक पोलीसांकडून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी जगदीश गावीत यांच्याकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे, संदेश पाठविणे अथवा इतर कोणत्याही प्रकारे मोबाईलचा वापर करणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायदयानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मोटार वाहन कायदयान्वये इतर संबंधीत कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकुण 67 वाहन चालकांवर 87000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांना भविष्यात अशा प्रकारचे कृत्य टाळण्याबाबत समज देण्यात आली आहे. नंदुरबार जिल्हा वाहतूक पोलीसांनी नागरीकांना आवाहन केले आहे की, स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहन चालवितांना मोबाईलचा वापर करु नये, तसेच वाहतूक नियमांचे पालन करावे व सुरक्षित वाहन चालवण्याची सवय अंगीकारावी, कोणीही वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.