*पालकांनी संवेदनशील असावे-प्राचार्य पी.डी.बोरसे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पालकांनी संवेदनशील असावे-प्राचार्य पी.डी.बोरसे*
*पालकांनी संवेदनशील असावे-प्राचार्य पी.डी.बोरसे*
दोंडाईचा(प्रतिनिधी):-"आमच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात विद्यार्थी अध्यापनाचे प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. त्यांना अनेक अभ्यासपूरक व अभ्यासेतर उपक्रमात सहभागी व्हावे लागते. अशावेळी पालकांनी आपल्या पाल्यांना समजून घेणे व सहकार्य करण्याची गरज असते. त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याच्या बाबतीत संवेदनशील असावे तसेच त्यांच्यावर ताण निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी." असे प्राचार्य पी.डी.बोरसे यांनी शिक्षक पालक मेळाव्यात उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना केले. दौलतसिंह रावल शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिक्षक पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यावेळी त्यांनी आपले विचार मांडले. सर्वप्रथम प्रा. डॉ.एम.एस.उभाळे यांनी कार्यक्रमाचा हेतू व रूपरेषा प्रास्ताविकातून स्पष्ट केली. त्यानंतर उपस्थित सर्व पालक व मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीदेवी व सहकार महर्षी दादासाहेब रावल यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. मान्यवरांच्या स्वागतानंतर प्राचार्य पी.डी.बोरसे यांनी संस्था व महाविद्यालया विषयीचे मनोगत सादर करून पालक व विद्यार्थी यांच्याकडून महाविद्यालयाच्या कोणत्या अपेक्षा आहेत, याविषयी सविस्तर विवेचन केले. काही पालक व विद्यार्थी यांनीही आपली मनोगते सादर केली. त्यानंतर स्वो.वि.संस्थेचे सहाय्यक सचिव आर.टी.गिरासे यांनी अध्यक्षीय मनोगतातून प्रशिक्षण घेताना विद्यापीठ व महाविद्यालयीन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अभिव्यक्ती प्रा.सौ. रेवती बागुल यांनी केली. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य पी.डी.बोरसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. एम.एस. उभाळे, प्रा.रवींद्र पाटील, प्रा.निशा ठाकूर, प्रा.रेवती बागुल, प्रा.सुनीता वळवी व प्रा.आर. एस.वळवी यांनी प्रयत्न केले. तर प्रशासकीय सेवक शंकर गिरासे, कृष्णा बागुल, अमर राजपूत व वीरपाल गिरासे सहकार्य केले.



