*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे संस्थेचे सचिव गणेश गोविंद पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे संस्थेचे सचिव गणेश गोविंद पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे संस्थेचे सचिव गणेश गोविंद पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):–शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड, जि. नंदुरबार येथे संस्थेचे सचिव गणेश गोविंद पाटील यांचा वाढदिवस 13 डिसेंबर 2025 रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात केक कापून करण्यात आली. उपस्थित सर्वांनी सचिव गणेश गोविंद पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी उपस्थित होते. तसेच प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थी तेजस पाडवी यांनी स्वतःच्या आवाजात गीत सादर करून सचिव साहेबाना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमात भावनिक व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. तसेच या सामाजिक उपक्रमाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील विविध आश्रमशाळा व शैक्षणिक संकुलांमध्ये शैक्षणिक साहित्य व फळांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप आनंदी व आपुलकीच्या वातावरणात झाला. उपस्थित सर्वांनी सचिव गणेश गोविंद पाटील यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.



