*सेवा, शिस्त व समाजभानाच्या संदेश देत अक्कलकुवा या ठिकाणी गृहरक्षक दलाच्या जवानांनी 79 वा वर्धापन दिवस साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सेवा, शिस्त व समाजभानाच्या संदेश देत अक्कलकुवा या ठिकाणी गृहरक्षक दलाच्या जवानांनी 79 वा वर्धापन दिवस साजरा*
*सेवा, शिस्त व समाजभानाच्या संदेश देत अक्कलकुवा या ठिकाणी गृहरक्षक दलाच्या जवानांनी 79 वा वर्धापन दिवस साजरा*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-गृह रक्षक दलाच्या जवानांच्या कार्यालय या ठिकाणी सातपुड्यातील आराध्य दैवत आई देव मोगरा मातेच्या प्रतिमेला व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला ही वंदन करून पूजन करण्यात आले. यानंतर अक्कलकुवा शहरातून मुख्य मार्गावरून रूट मार्च करण्यात आला. ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा बस स्थानक श्री महाकाली माता मंदिर सोरापाडा अक्कलकुवा या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपस्थित रुग्णांना व मीनाताई ठाकरे मतिमंद विद्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांना फळ वाटप करून आधार देण्याचा प्रयत्न केला. यानंतर या दोन्ही ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी गृहरक्षक दलाचे अक्कलकुवा तालुका समादेशक कंपनी कमांडर विपुल शिंपी, वरिष्ठ फलटणनायक शोएब काझी, फलटण नायक किशोर ठाकूर, फलटण नायक जितेंद्र पवार, फलटण नायक मंजिला पाडवी, पलटण नायक मीना वसावे. यांच्यासह बहुसंख्या गृहरक्षक दलाचे पुरुष व महिला जवान या ठिकाणी उपस्थित होते.