*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे इंडक्शन प्रोग्राम व पालक सभा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे इंडक्शन प्रोग्राम व पालक सभा संपन्न*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे इंडक्शन प्रोग्राम व पालक सभा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):–शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नंदुरबार येथे 13 डिसेंबर 2025 रोजी नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम व पालक सभा यशस्वीरीत्या पार पडली. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य पंकज एम. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. नवप्रवेशित विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्यपूर्ण अभ्यास व नैतिक मूल्यांचा अंगीकार करून आपले शैक्षणिक व वैयक्तिक जीवन घडवावे. पालक व संस्था यांच्या समन्वयातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य होऊ शकतो. असे प्राचार्य पंकज चौधरी यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून सांगितले ”इंडक्शन प्रोग्रामच्या माध्यमातून नवागत विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची शैक्षणिक रचना, नियमावली, अभ्यासक्रम व विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. फार्मसी शिक्षणाचे महत्त्व, शिस्त, अभ्यासासोबतच नैतिक मूल्ये जपण्याचे महत्त्व प्रा. तश्विता मगरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून स्पष्ट केले. कार्यक्रमास पालकवर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालक सभेमध्ये पालकांनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळी पालक अशोक बोरसे यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत संस्थेच्या शैक्षणिक कार्यपद्धतीचे कौतुक केले. पालकांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील असल्याचे नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक समितीने विशेष परिश्रम घेतले. टीमचे प्रमुख प्रा.कल्याणी चौधरी, प्रा.जागृती शेवाळे, प्रा.पूजा गायकवाड, प्रा.भावना वसावे, प्रा. रोहिणी पाटील व प्रा.श्रध्दा पाटील यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षा योगीता गणेश पाटील व सचिव गणेश गोविंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन व कौतुक केले.



