*शहादा येथे 45वा फेस्कॉम दिवस उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शहादा येथे 45वा फेस्कॉम दिवस उत्साहात संपन्न*
*शहादा येथे 45वा फेस्कॉम दिवस उत्साहात संपन्न*
शहादा(प्रतिनिधी):-12 डिसेंबर रोजी शहादा येथे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ(फेस्कॉम)चा 45 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात श्री संत नरहरी महाराज, जेष्ठ नागरिक मंडळ शहादा, लोकमान्य ज्येष्ठ नागरिक मंडळ शहादा, सरदार पटेल ज्येष्ठ नागरिक मंडळ शहादा व क्रांतिज्योती सावित्रीबाई महिला ज्येष्ठ नागरिक शहादा यांच्या सहयोगाने फेस्कॉम वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहादा तालुका ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष निवृत्त प्राचार्य जे. डी. पटेल होते. कार्यक्रमासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे प्रथम सहर्ष स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर खान्देश फेस्कॉम संचालक रामजी पाटील, जे. डी. पटेल, नंदुरबार जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ जिल्हाध्यक्ष प्रताप चव्हाण, व्याख्याते निवृत्त प्राचार्य एस. पी.पाटील, डॉ. शशिकांत कुळकर्णी, के. डी. गिरासे, गजानन विसपुते.हे विराजमान होते ज्येष्ठ नागरिक या संघटनेचे संस्थापक डॉ.रामकृष्ण भट यांच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील मान्यवरांनी केले. सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींनी खरा तो एकची धर्म ही साने गुरुजींची प्रार्थना सामुदायिक रित्या म्हटली. याप्रसंगी या महिन्यात वाढदिवस असलेल्या सभासदांचा स्वागत सत्कार करण्यात आला. या महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला.
मनोगतात फेस्कॉम या संस्थेची सविस्तर माहिती व न्यायव्यवस्था ज्येष्ठ नागरिकांचे हक्क व कर्तव्य याची जाणीव ज्येष्ठ नागरिक शहादा तालुका अध्यक्ष जे.डी.पटेल यांनी दिली. 12 डिसेंबर 1980 मध्ये डोंबिवलीला डॉ. राधाकृष्ण भट यांनी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ स्थापन केला. महाराष्ट्रात 6000 ते 7000 ज्येष्ठ नागरिक संघ आहेत. त्यात 1000महिला ज्येष्ठ नागरिक संघ आहेत. प्रमुख वक्तेनिवृत्त. प्राचार्य. एस.पी.पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांचे कर्तव्य आपली वागणूक ज्येष्ठ निधी दिनचर्या ज्येष्ठांनी सकारात्मक क्रियाशील राहण्यासाठी करावयाच्या गोष्टी याचे विवेचन केले. ज्येष्ठ कवी मोहन पाटील यांनी स्त्री जीवनावर छोटीशी सुंदर कवितेचे गायन केले. नारी शक्तीची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक बंधू-भगिनी उपस्थित होते या कार्यक्रमास. लोकमान्य ज्येष्ठ नागरिक मंडळ शहादाचे अध्यक्ष रामजी विठ्ठल पाटील, सरदार पटेल ज्येष्ठ नागरिक संघ शहादाचे. सचिव. आनंदराव विसपुते, फेस्कॉम. प्रसिद्धी प्रमुख डी. जी.पाटील, निवृत्त प्राचार्य ईश्वर बी. चौधरी, प्रा.शरद पाटील, क्रांतिज्योती सावित्रीबाई महिला ज्येष्ठ नागरिक संघ शहादाच्या अध्यक्षा श्रीमती कांताबेन काशिनाथ पाटील, श्रीमती अल्काबेन चौधरी, सौ. वसुधा पाटील, विवेक पाटील, संपत कोठारी, सुदाम पाटील, इत्यादी ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता. ज्येष्ठ नागरिक बिपीन पाटील, व चुनिलाल क्षीरसागर यांचेकडून सुरुची भोजन देण्यात आले. आभार सचिव गजानन विसपुते यांनी मानलेत. व सूत्रसंचालन ऍड. जसराज संचेती यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.



