*बेलापूर गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचा सेवाभाव आदर्श घेण्यासारखा-पंढरीनाथ बोकारे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बेलापूर गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचा सेवाभाव आदर्श घेण्यासारखा-पंढरीनाथ बोकारे*
*बेलापूर गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचा सेवाभाव आदर्श घेण्यासारखा-पंढरीनाथ बोकारे*
नांदेड(प्रतिनिधी):-नवी मुंबई भागातील बेलापूर गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचा सेवाभाव आदर्श घेण्यासारखा असल्याचे प्रतिपादन नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी केले.नानक साई फाऊंडेशन नांदेडचा संत नामदेव जीवन गौरव पुरस्कार पनवेल येथील आवाज महामुंबईचा न्यूज चॅनलचे संपादक मिलिंद खार पाटील यांना जाहीर झाला होता. या पुरस्काराचे पनवेल येथे समारंभपूर्वक वितरण झाले. दरम्यान हा कार्यक्रम आटोपून वरिष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांनी नवी मुंबई येथील बेलापूर गुरुद्वारा ला भेट दिली. त्यांचे गुरुद्वारा प्रबंधक कमिटी ने स्वागत केले. त्यांचा सेवाभाव अनुभऊन आम्ही धन्य झालो अशी भावना प्रतिपादन नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांनी व्यक्त केली. प्रबंधक कमिटीद्वारा बोकारे व अयुब पठाण यांचा सत्कार केला. गुरुद्वारा प्रबंधक कमिटी चे अध्यक्ष सरदार जसबिर सिंघ, सरदार बलविंदरसिंघ घुमान, सरदार नवतेजसिंघ पम्मी थिंड, सरदार बुटा सिंघ, सरदार गुरुप्रित्तसिंघ घुमान सरदार गज्जनसिंघ हे उपस्थित होते.



