*खांडबारा येथे जिवलग मित्रानेच केला विश्वासघात; व्यापाऱ्याच्या गल्ल्यातून दररोज ‘नोटा’ लंपास करण्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*खांडबारा येथे जिवलग मित्रानेच केला विश्वासघात; व्यापाऱ्याच्या गल्ल्यातून दररोज ‘नोटा’ लंपास करण्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद*
*खांडबारा येथे जिवलग मित्रानेच केला विश्वासघात; व्यापाऱ्याच्या गल्ल्यातून दररोज ‘नोटा’ लंपास करण्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात जितेंद्र परदेशी यांच्या मालिकेचे खत व बियाणे विक्रीचे दुकान असून, दुकानाच्या गल्ल्यातून पैसे ‘दररोज’ चोरले जात असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले असून, चोर कुणी अनोळखी नसून दुकानाचे मालक असलेल्या जितेंद्र परदेशी यांचाच जिवलग मित्र असल्याचे उघड झाले आहे.
जितेंद्र परदेशी यांनी आपल्या दुकानात दोन्ही बाजूंना सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत, गेल्या काही दिवसांपासून गल्ल्याच्या रकमेतील फरक जाणवत असल्याने जितेंद्र परदेशी यांच्या मनात संशय निर्माण झाला, त्यांनी आपल्या दुकानातील सीसीटीव्हीच्या फुटेजची तपासणी केली असता, त्यांना अक्षरशः आश्चर्याचा धक्काच बसला, दुकानात नेहमी येणारा त्यांचाच जिवलग मित्र अनिल शर्मा पैशाच्या गल्ल्याजवळील खुर्चीवर बसून दुकानाचे मालक असलेले जितेंद्र परदेशी यांची नजर चुकवून हळूच गल्ल्यात हात घालून आणि नोटा खिशात टाकत असल्याचे दिसून आले, हे वारंवार होत असल्याचे दिसून आले, सीसीटीव्हीच्या फुटेजनुसार ही चोरी एक दिवसाची किंवा योगायोगाने झालेली नव्हे, तर दररोजची ‘नियमित’ कृती असल्याचे स्पष्ट झाले आहे, फुटेजमध्ये स्पष्ट दिसून आले की अनिल शर्मा ठराविक वेळेला दुकानात येतो, गल्ल्याजवळ आरामात बसतो, दुकान मालक जितेंद्र परदेशी हे इतर कामात गुंग झाले की गल्ल्याकडे हात वळवतो, आणि सहजपणे गल्ल्यातील नोटा स्वतःच्या खिशात टाकतो, अतिविश्वास आणि जवळच्या नात्याचा गैरफायदा घेत केलेल्या या कृतीने व्यापाऱ्याला मानसिक धक्का बसला आहे, सध्याहा चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, या प्रकरणात जितेंद्र सुरेश परदेशी यांच्या फिर्यादीवरून अनिल रंजनलाल शर्मा यांच्याविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.



