*लांजा शहरात तातडीने शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्याची जनतेची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लांजा शहरात तातडीने शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्याची जनतेची मागणी*
*लांजा शहरात तातडीने शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्याची जनतेची मागणी*
लांजा(प्रतिनिधी):-मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणात लांजा शहरात एकमेव असलेले निर्मळ शौचालय बाधित ठरल्याने जमीनदोस्त करण्यात आल्याने लघुशंका व शौचालयासाठी सर्वच जनतेची प्रचंड गैरसोय झाली असून संबंधित यंत्रणेकडून जनतेची गैरसोय ताबडतोब दूर करावी अशी मागणी जनतेतून होत आहे लांजा शहरात मध्यवर्ती भागात मुंबई गोवा महामार्गावर हे एकमेव निर्मळ शौचालय होते लांजा तालुक्यात, आठवडा बाजारात येणारे नागरिक, फिरते व्यापारी, रिक्षा व्यावसायिक यांना हे शौचालय सोयीचे ठरत होते मात्र मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात शौचालयाची अर्धी इमारत बाधित ठरत असल्याने संपूर्ण इमारत तोडण्यात आली नव्याने शौचालय इमारत बांधण्यास विलंब होणार असल्याने लघुशंकेसाठी व शौचालयाला जायचे कुठे हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. लांजा हे तालुक्याचे ठिकाण असताना लांजात निर्मळ शौचालयाची दुसरी अन्य व्यवस्था नसल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सध्या बसस्थानकातील सार्वजनिक मुताऱ्या व शौचालयाचा आधार नागरिकांना घ्यावा लागत आहे. परंतु दररोज येथे जाणे गैरसोयीचे ठरणारे आहे येथे नवीन इमारत बांधण्यास विलंब लागणार असल्याने सध्या होणारी गैरसोय लक्षात घेऊन तातडीने नवीन इमारत बांधून गैरसोय दूर करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे



