*नंदुरबार येथील शेतकऱ्यांचे आयसीएआर –भारतीय श्री अन्न संशोधन संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स) येथे चार दिवसीय प्रशिक्षण संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथील शेतकऱ्यांचे आयसीएआर –भारतीय श्री अन्न संशोधन संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स) येथे चार दिवसीय प्रशिक्षण संपन्न*
*नंदुरबार येथील शेतकऱ्यांचे आयसीएआर –भारतीय श्री अन्न संशोधन संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स) येथे चार दिवसीय प्रशिक्षण संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी (IAS) यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच IIMR, हैद्राबाद कृषि विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त सहकार्याने, डॉ. हेडगेवार सेवा समिती कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार अतंर्गत चार दिवसीय “नंदुरबारच्या आदिवासी शेतकऱ्यांसाठी मिलेट-आधारित तंत्रज्ञान” या विषयावर चार दिवसीय आयसीएआर – भारतीय श्री अन्न संशोधन संस्था, हैद्राबाद 9 ते 12 डिसेंबर 2025 दरम्यान प्रशिक्षण पहिल्या तुकडीचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी डॉ. सी. तारा सत्यवर्ती, संचालक, ICAR IIMR हैद्राबाद, डॉ. सी. श्रीनिवास बाबू संचालक, ओडिशा मिलेट मिशन, डॉ.
संगाप्पा वरिष्ठ
शास्त्रज्ञ ICAR IIMR, कु. मेघना, कु. मोनालिसा सहाय्यक आदी उपस्थित होते. यावेळेस तृणधान्याच्या माध्यमातून
पारंपारीक तृणधान्याला प्रक्रिया व मूल्यवर्धन तंत्रज्ञानाची जोड दिल्यास आदिवासी क्षेत्रातील महिला व युवांसाठी नवीन उद्यमसंधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी प्रशिक्षणात दाखविलेली तंत्रज्ञान स्वतःच्या गावात आत्मसात करून स्वावलंबी ‘मिलेट अर्थव्यवस्था’ घडविण्यात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच. डॉ. संगाप्पा वरिष्ठ
शास्त्रज्ञ यांनी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रम आदिवासी शेतकऱ्यांची तांत्रिक कौशल्ये, आत्मविश्वास, आणि उद्यमशीलता वृत्ती वाढविण्यास मोठी मदत करणार आहे. वैज्ञानिक लागवड पद्धती व मूल्यवर्धित तंत्रज्ञान अवलंबून ते आपली आजीविका विविधीकृत करू शकतील, कुटुंबातील पोषण सुधारू शकतील आणि बाजरी- आधारित उद्योगांद्वारे अधिक उत्पन्न मिळवू शकतील असे प्रतिपादन केले. चार दिवसीय प्रशिक्षण स्टार्टअप सेंटर सेंटर ऑफ एक्सलन्स (मूल्यवर्धन आणि अन्न प्रक्रिया) श्री अन्न प्रक्रिया आणि प्रशिक्षण संस्था, श्री अन्न प्रक्रिया आणि इनकुबेशन सेंटर,
जिन बँक न्यूट्री हब व न्यूट्री हब बेकर्स युनिटमध्ये ज्वारी, नागली, सावा, भगर, बर्टी, राळा या तृणधान्यापासून बिस्किटे, केक,
दलिया, रवा, पीठ, शेवया, मिलेट चिक्की, मुरमुरे, पफिंग, इडली प्रीमिक्स आदी तृणधान्यापासून पदार्थ तयार करून प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच सेंटर मधील व्यक्युम पॅकिंग यंत्र, बिस्कीट साठी वायर कट यंत्र, प्लॅनेटरी मिक्सर, ब्लेंडिंग यंत्र, मिलिंग यंत्र, फ्लेकिंग यंत्र, पफिंग यंत्र, बेकिंग यंत्र, पास्ता नूडल्स साठी यंत्र, मिक्सर, पोलीशर डीहस्कर, डीहलर, काढणी पश्चात भात यंत्र, ऍस्पिरेटर, रवा यंत्र, स्वयंचलित पॅकिंग यंत्र आदी यंत्राची माहिती घेऊन प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच ब्रँडिंग, किंमत निर्धारण, व्यवसाय उभारणी आणि बाजारपेठेतील संधी याविषयी सत्रे आयोजित करण्यात आली. संदिप कुवर यांनी प्रशिक्षणात न्यूट्री हब, बेकर्स युनिट, स्टार्टअप ऑफ एक्सलन्स येथील झालेल्या सत्र विषयी माहिती देऊन नागली पिकाचे विविध पदार्थ पीठ, प्रीमिक्स, लाडू, बिस्कीट तयार करून त्याला चांगली पॅकिंग करण्याचे नियोजन करण्याचे ठरवले आहे असे अनुभव कथन केले. रामसिंग वळवी यांनी
नंदुरबार
जिल्ह्यातील मिलेट लागवड व
मूल्यवर्धन व प्रक्रिया विषयी सधस्थिती विषयी माहिती देऊन प्रशिक्षणा बद्दल अनुभव कथन केले. तसेच दिलीप पाडवी यांनी आयोजित प्रशिक्षण हे आमच्यासाठी प्रेरणादायी असून
नक्कीच आम्ही जिल्ह्याला मिलेटमय करून असे अनुभव कथन केले. सौ. रमिला वसावे यांनी या प्रशिक्षणातून माहिती घेऊन जिल्ह्यातील बचत गटातील महिलांना प्रक्रिया व बाजारपेठ मिळविण्याकरिता प्रशिक्षक म्हणून कार्य करणार असल्याची अनुभव सांगितले. कृषि विज्ञान केंद्र नंदुरबार येथील शास्त्रज्ञ सौ. आरती देशमुख
यांनी नंदुरबार जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी यांच्या व्यवसायाची ओळख करून दिली व जिल्ह्यातील सुरू असलेल्या प्रक्रिया उद्योगाची माहिती दिली व IIMR हैद्राबाद यांचे आभार मानले. या प्रशिक्षणामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील विविध बाजरी-आधारित शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) व गटातील सहभागींचा उत्स्फूर्त सहभाग होता. त्यामध्ये जिल्ह्यातील अमोप FPO, मोलगी, आमू अखा एक से FPO, काकडदा, सूर्यदर्शन FPO, कात्री , तोरणा CMRC, माविम, धडगांव, राणी काजल CMRC, माविम, मोलगी, नर्मदा माता स्वयं- साहाय्य गट, उमेद, खडक्या, राजा पांठा गट, आत्मा तऱ्हावद, PMFME उद्योजक व वैयक्तिक उद्योजक चार दिवसांच्या प्रशिक्षणात सहभागी उत्साहाने सहभागी झाले आणि प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण पार पडला. प्रशिक्षणा करिता कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथील शास्त्रज्ञ सौ. आरती देशमुख यांचे अनमोल सहकार्य लाभले.



