*ग्रामीण रुग्णालय, धानोरा येथे ‘सिकल सेल कॉर्नर’ ची स्थापना*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ग्रामीण रुग्णालय, धानोरा येथे ‘सिकल सेल कॉर्नर’ ची स्थापना*
*ग्रामीण रुग्णालय, धानोरा येथे ‘सिकल सेल कॉर्नर’ ची स्थापना*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सिकल सेल आठवड्यानिमित्त ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे सिकल सेल रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या ‘सिकल सेल कॉर्नर’ ची स्थापना करण्यात आली. या उपक्रमामुळे सिकल सेल रुग्णांचे परीक्षण, उपचार, समुपदेशन तसेच फॉलो-अप सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे तसेच बोली भाषेत शरद मावची, समुपदेशक यांनी रुग्णांना सिकल सेल बाबत मार्गदर्शन करण्यात आले. हा उपक्रम नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नरेश पाडवी, तसेच प्रभारी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
या कार्यक्रमाचे नेतृत्व धानोरा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रीती पटले यांनी केले. सिकल सेल आठवड्यानिमित्त संपूर्ण आठवडाभर विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने दिली. यामध्ये सिकल सेल तपासणी शिबिरे, समुपदेशन सत्रे, रक्तगट तपासणी, रोगप्रतिबंधक मार्गदर्शन, रुग्णांशी संवाद बैठक तसेच विद्यार्थी आणि नागरिकांसाठी जनजागृती व्याख्याने यांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे धानोरा येथे सिकल सेलविषयी जागरूकता वाढण्यास मदत होणार असून अधिकाधिक नागरिकांनी सिकल सेल तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ प्रीती पटले यांनी केले करण्यात आले आहे. डॉ अल्पेशा वळवी, दिपक वाघ, श्रीमती दिनू वळवी, शरद मावची यांनी परिश्रम घेतले.



