*श्रीमती प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिरात 'शाळा अंतर्गत विज्ञान प्रदर्शन' उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्रीमती प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिरात 'शाळा अंतर्गत विज्ञान प्रदर्शन' उत्साहात संपन्न*
*श्रीमती प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिरात 'शाळा अंतर्गत विज्ञान प्रदर्शन' उत्साहात संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-येथील वेस्ट खान्देश भगिनी सेवा मंडळ धुळे संचलित, श्रीमती प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिरात शाळा अंतर्गत विज्ञान प्रदर्शनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक राहुल मोरे प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून समुत्कर्ष क्लासेस चे संचालक ललित महाजन, नवोदय, स्कॉलरशिप परीक्षा मार्गदर्शक जि.प. शिक्षक संतोष एकलरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व भारताचे मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. कुमुद शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा आपल्या मनोगतातून उजाळा दिला. तर शाम शिंदे यांनी विद्यार्थ्यांना आजच्या जीवनात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व आणि त्याची आवश्यकता सांगितली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनात शाळेतील विद्यार्थ्यांचे एकूण 41 उपकरणांनी सहभाग नोंदवला. त्यात 83 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी बनवलेल्या- पाण्याची बचत, सौर ऊर्जेची गरज, सेंद्रिय शेती, अन्न आणि आरोग्य, मानवनिर्मित आपत्ती, पाण्याचे व्यवस्थापन, दळणवळण, ठिबक सिंचन, AI, मशीन लर्निग या विषयांवर आधारित उपकरणांनी लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपकरणांचे परीक्षकांनी निरीक्षण करून त्यात इयत्ता पहिली व दुसरी, तिसरी व चौथी या दोन गटातून प्रत्येकी तीन क्रमांक काढण्यात आले. त्यात पहिली व दुसरी गटातून
प्रथम- प्रणिती नितीन वसईकर 1 ली - ड - गणितीय उपकरण, द्वितीय- महेश्वरी भिकन सूळ 2 री - अ - नविनिकरणीय ऊर्जा, तृतीय- सानवी प्रकाश बोरसे 2 री - ड - जलशुद्धीकरण यंत्र,
उत्तेजनार्थ- तनुश्री संदीप माळी 1 ली - ड - गणितीय उपकरण मजेशीर बेरीज व वजाबाकी.
तर तिसरी व चौथी या गटातून प्रथम- तनुष्का राजेंद्र जाधव 4 थी - क - टाकाऊ पासून टिकाऊ - सुगंधी धूपबत्ती, द्वितीय- नव्या कांतीलाल सोनवणे 3 री - अ -वाहतूक व दळणवळण- रस्ता सुरक्षा आणि अपघात प्रतिबंध मॉडेल, तृतीय- हृदया हेमंत परदेशी 3 री - ब - गणितीय डिव्हिजन मॉडेल
उत्तेजनार्थ- पूर्वी संतोष पवार 4 थी - क - नैसर्गिक शेती- सेंद्रिय कीटकनाशक
या उपकरणांचा क्रमांक आला.
विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाम शिंदे यांनी तर सूत्रसंचालन कुमुद शिंदे, आभार शशिकांत निकम यांनी मानले कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.



