*जिल्हास्तरीय रब्बी हंगाम कार्यशाळा संपन्न,जिल्ह्यातील 230 खत विक्रेते / कंपनी प्रतिनिधी उपस्थित*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हास्तरीय रब्बी हंगाम कार्यशाळा संपन्न,जिल्ह्यातील 230 खत विक्रेते / कंपनी प्रतिनिधी उपस्थित*
*जिल्हास्तरीय रब्बी हंगाम कार्यशाळा संपन्न,जिल्ह्यातील 230 खत विक्रेते / कंपनी प्रतिनिधी उपस्थित*
नंदुरबार(प्रतिनिधी):-11 डिसेंबर 2025 रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी किशोर हडपे, कृभकोचे विभागीय व्यवस्थापक शंकर शेंडगे, कोळसा कृषी विज्ञान केंद्राचे कृषी तज्ञ पी.सी.कुंदे यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृह येथे जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा उत्पादक व विक्रेते रब्बी हंगाम सन 2025 कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळेस जिल्हा परिषद कृषी विभागाचे मोहीम अधिकारी सचिन देवरे, जिल्हा कृषी विभागाचे गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्नील शेळके, जिल्हा कृषी निविष्ठा विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष कन्हैय्यलाल पटेल, खत व बियाणे कंपनी प्रतिनिधी, जिल्ह्यातील जवळपास 230 खत / बियाणे निविष्ठा विक्रेते उपस्थित होते. सदर कार्यशाळेत स्वप्निल शेळके यांनी महाविस्तार AI ॲप बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कुंदे शास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र यांनी रब्बी हंगामातील प्रमुख पिके गहू, हरभरा, व मका या पिकांबाबत सखोल मार्गदर्शन केले. शंकरराव शेंडगे कृभको यांनी जैविक व सेंद्रीय खतांचा वापर शेतीत वाढविणेबाबत व EPOS मशिनव्दारे खत विक्री करणे बाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर किशोर हडपे, कृषी विकास अधिकारी, यांनी केंद्र शासनाने विकसित केलेल्या बियाणे विक्रीसाठीच्या साथी पोर्टलबाबत बियाणे विक्रेते यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर चंद्रकांत पवार, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नंदुरबार यांनी बियाणे विक्रेते यांनी साथी पोर्टलचा वापर करावा व महाविस्तार AI ॲप जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून वापरात आणण्याचे आवाहन केले. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक सचिन देवरे मोहिम अधिकारी, सुत्रसंचालन महेश विसपूते कृषि अधिकारी व आभार प्रदर्शन योगेश हिवराळे कृषि अधिकारी यांनी केले.



