*आयुर्वेद रुग्णालयातर्फे शालेय तपासणी शिबिर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आयुर्वेद रुग्णालयातर्फे शालेय तपासणी शिबिर*
*आयुर्वेद रुग्णालयातर्फे शालेय तपासणी शिबिर*
नांदेड(प्रतिनिधी):-येथून जवळच असलेल्या रहाटी या गावी 10 डिसेंबर 2025 रोजी, प्राथमिक आरोग्य केंद्र राहटी परिक्षेत्रात, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघी ता जी नांदेड येथे स्कूल हेल्थ चेक अप कार्यक्रमा अंतर्गत स्त्री रोग आणि बालरोग विभाग शासकीय आयुर्वेद रुग्णालय नांदेड यांचे वतीने शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन आणि तपासणी शिबीर यशस्वी रित्या आयोजित केले. या शिबिरात मध्ये विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक जागृती करण्यात आली आणि त्यांची तपासणी करून आवश्यकते नुसार बाल रक्षा किट, जंतूनाशक गोळ्या, लोहवर्धक गोळ्या इत्यादी औषधें मोफत वितरित करण्यात आली. या शिबिराचा लाभ 537 विद्यार्थ्यांनी घेतला. शासकीय आयुर्वेद रुग्णालय नांदेड चे अधिष्ठाता डॉ वाय आर पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ मंजुषा पाटील यांनी शिबिरासाठी सर्वतोपरी सुविधा उपलब्ध केल्या. स्त्री रोग विभाग प्रमुख डॉ सौदामिनी चौधरी यांनी व्यवस्थापन पाहिले. सहाय्यक प्राध्यापक डॉ गोपाळ जाधव, पिजी विद्यार्थी डॉ दीप्ती शिंदे, बालरोग पिजी विद्यार्थी डॉ आरती, डॉ कन्हैया, आंतरवासियता विद्यार्थी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र राहटी च्या वतीने डॉ सूर्यवंशी, डॉ पांचाळ हे उपस्थित होते. शिबिराचे नियोजन मुख्याध्यापक देवकते यांनी पाहिले.



