*तुळाजा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तुळाजा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न*
*तुळाजा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील तुळाजा येथे जि. प. शाळा व माध्यमिक विद्यालय तुळाजा यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र
स्तरीय शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्र प्रमुख डी. जी. वायकर होते. तर प्रमुख पाहुणे सचिन राहसे व शा. व्य.समिती अध्यक्ष किरण डुमकुळ होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून दीपप्रज्लन करण्यात आले. त्यानंतर जि. प. शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत तसेच ईशस्तवन गीतसह अभिनय
सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी सकारात्मक शिस्त
या घोषवाक्याची आकर्षक रांगोळी
काढून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यानंतर मान्यवरांचे स्वागत श्रीफळ, तसेच गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. केंद्र प्रमुख डी. जी. वायकर यांनी प्रभावी
मार्गदर्शन केले. त्यानंतर सकारात्मक शिस्त या सत्राचे
करण्यात आले. तसेच नियोजित ताशिका घेण्यात आल्या. तसेच नव्याने रूजू झालेल्या शिक्षकांचा परिचय करून त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर परिषदेला केंद्रातील सर्व
पदोन्नती मुख्याध्यापक, शिक्षक तसेच माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. त्यात केंद्र शाळा बोरद 1 व 2
मालदा, करडे, बन, लाखापुर जुवानी
तसेच माध्यमिक शाळेचा सहभाग होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक पाटील यांनी केले तर आभार उंबरसिंग वसावे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदोन्नती मुख्याध्यापक भरत वळवी तसेच माध्यमिक विद्यालायचे
मुख्याध्यापक उमेश पाटील तसेच
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



