*उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसवण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ-उत्तम जाधव*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसवण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ-उत्तम जाधव*
*उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसवण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ-उत्तम जाधव*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र परिवहन विभागाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
प्रमुख तपशील:
बंधनकारक: 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व खासगी आणि परिवहन संवर्गातील वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) बसवणे अनिवार्य आहे.
अंतिम मुदत: वाहनधारकांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत त्यांच्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) बसवून घेणे आवश्यक आहे.
कारवाई: 1 जानेवारी 2026 पासून, ज्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) नसेल, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) बसवल्याशिवाय वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा चढवणे/उतरवणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, ना-हरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहनांमध्ये बदल करणे यासारखी वाहनाविषयक कामे केली जाणार नाहीत. तथापि, जुन्या परिवहन संवर्गातील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, परवानाविषयक कामकाज, तसेच खाजगी संवर्गातील वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण या कामांना यातून वगळण्यात आले आहे. असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जाधव यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



