*बनावट वेबसाईट,ॲप्स आणि लिंक्सपासून सावधगिरी बाळगा-उत्तम जाधव*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बनावट वेबसाईट,ॲप्स आणि लिंक्सपासून सावधगिरी बाळगा-उत्तम जाधव*
*बनावट वेबसाईट,ॲप्स आणि लिंक्सपासून सावधगिरी बाळगा-उत्तम जाधव*
नंदुरबार(प्रतिनिधी):-ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, आणि ई-चलन सेवांशी संबंधित बनावट वेबसाइट्स, फसवे मोबाईल अॅप्स (APKs), आणि एसएमएस/व्हॉट्ॲप (SMS/WhatsApp) याद्वारे पाठविल्या जाणाऱ्या खोट्या लिंकपासून नागरिकांनी सावध रहावे असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, उत्तम जाधव यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. फसवणूक करणारे सहसा खालील प्रकारचे संदेश पाठवून नागरिकांना जाळ्यात ओढतात: “आपल्या वाहनाचे चलन बाकी असून त्वरित दंड भरण्याची धमकी” आणि अनधिकृत पेमेंट लिंक पाठवणे.
वाहन चालविण्याचा परवाना (“DL”) सस्पेंड होणार आहे, त्वरित तपासणी करा” असे संदेश पाठवणे. “RTO Services.apk”, “mParivahan_Update.apk”, “eChallan_Pay.apk” अशा नावाच्या अनधिकृत APK ॲप्स/फाईल्स डाउनलोड करण्यास प्रवृत्त करणे.
महत्त्वाची सूचना
उप प्रादेशिक कार्यालय किंवा परिवहन विभागाकडून नागरिकांच्या मोबाईलवर कधीही व्हॉट्ॲप (WhatsApp) द्वारे पेमेंट लिंक पाठवली जात नाही. अनोळखी स्त्रोतांकडून आलेल्या APK फाईल्स डाउनलोड करू नका, कारण यामुळे ओटीपी (OTP), बँकिंग माहिती आणि इतर संवेदनशील डेटा चोरीला जाऊ शकतो. सर्व वाहन चालक/मालक यांनी केवळ परिवहन विभागाच्या खालील अधिकृत शासकीय संकेतस्थळांचा वापर करावा: वाहन नोंदणी सेवा (VAHAN) - https://vahan.parivahan.gov.in ड्रायव्हिंग लायसन्स सेवा (SARATHI) - https://sarathi.parivahan.gov.in परिवहन सेवा - https://www.parivahan.gov.in ई-चलन पोर्टल - https://echallan.parivahan.gov.in ही सर्व अधिकृत संकेतस्थळे “gov.in” ने समाप्त होतात. “.com”, “.online”, “.site”, “.in” अशा डोमेनवरील कोणत्याही वेबसाइटवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये किंवा ती उघडू नये. नागरिकांनी कोणताही संशयास्पद संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यास तात्काळ खालील ठिकाणी तक्रार नोंदवावी. National Cyber Crime Portal: https://www.cybercrime.gov.in सायबर फसवणूक हेल्पलाईनः 1930
जवळचे जिल्हा सायबर पोलीस स्टेशन



