*गट शेती प्रीमियर लीग 2025 सन्मान सोहळा, नंदुरबारमध्ये उत्साहात झाला शेतकरी गटांचा सन्मान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गट शेती प्रीमियर लीग 2025 सन्मान सोहळा, नंदुरबारमध्ये उत्साहात झाला शेतकरी गटांचा सन्मान*
*गट शेती प्रीमियर लीग 2025 सन्मान सोहळा, नंदुरबारमध्ये उत्साहात झाला शेतकरी गटांचा सन्मान*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात, 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता, पानी फाऊंडेशन अंतर्गत आयोजित गट शेती प्रीमियर लीग 2025 मधील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी गटांचा भव्य सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. गेल्या वर्षभरात विविध अडचणींना तोंड देत, शेतीतील निर्धारित SOPs नुसार काम करत गटशेतीत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या नंदुरबार तालुक्यातील 19 व शहादा तालुक्यातील 17 शेतकरी गटांचा यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल हे होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न झाला. तसेच
दीपक पटेल प्रकल्प संचालक, आत्मा
यशवंत ठाकुर जिल्हा अभियान व्यवस्थापक, उमेद अभियान, नंदुरबार उमेश भदाणे जिल्हा तांत्रिक अधिकारी, फलोत्पादन कृषी विभाग, नंदुरबार यांची देखील प्रमुख उपस्थिती लाभली. शेतकरी सदस्यांचे अनुभव कथन
कार्यक्रमादरम्यान शेतकरी गटातील सदस्य प्रवीण कोकणी, दिनेश पावरा, श्रीमती यशोदा माळी, आणि श्रीमती कविता भामरे यांनी मंचावरून त्यांचे मनोगत व्यक्त केले. गटशेती करताना मिळालेले अनुभव, व्यवस्थापनातील शिकवण, समस्यांवर केलेली मात आणि मिळवलेले यश त्यांनी उत्स्फूर्तपणे मांडले. शेतकऱ्यांचे अनुभव ऐकून मान्यवर आणि सभागृहातील वातावरण भारावून गेले. अध्यक्षीय भाषणात नमन गोयल यांनी पुढील वर्षी संपूर्ण जिल्ह्यात पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गटशेतीविषयक उपक्रम राबवण्याचे आवाहन केले. तसेच पिकानुसार गट तयार करुन उत्पादकता वाढीसाठी sop चे योग्य पालन करणे, गट शेतीच्या माध्यमातून जिल्ह्याची अद्वितीय ओळख निर्माण करावी यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल असेही त्यांनी आश्वासन दिले. या सन्मान सोहळ्यात नंदुरबार व शहादा या दोन्ही तालुक्यातील 36 शेतकरी गटांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यासाठी डॉ. अविनाश पोळ व सत्यवान सरांचे मार्गदर्शन व भुषण ठाकरे, गोपाल पाटील, योगीराज हाके, अविनाश काळे, सीमा पाडवी, केतन पाटील, स्वप्नील गोसावी सर्व टीमच्या मेहनतीने कार्यक्रम यशस्वी झाला. हा सन्मान सोहळा म्हणजे केवळ पुरस्कार कार्यक्रम नव्हता, तर संपूर्ण जिल्ह्यातील गटशेती चळवळीला नवीन दिशा देण्याचा, शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याचा आणि पाणी फाऊंडेशनच्या कार्याचा सन्मान करणारा एक उत्सव ठरला.



