*आगरवाडी जैतापूर येथे पाखाडीचा शुभारंभ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आगरवाडी जैतापूर येथे पाखाडीचा शुभारंभ*
*आगरवाडी जैतापूर येथे पाखाडीचा शुभारंभ*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील जैतापूर ग्रामपंचायत अंतर्गत अमोल मांजरेकर ते देव विठ्ठल मंदिर ते बंड्या खोत मांजरेकर गेटपर्यंत चिरेबंदी पाखाडीचा बांधकाम शुभारंभ मुंबईस्थित परंतु सदैव आपल्या गावच्या विकासासाठी झटणारे शाखाप्रमुख संदीप शिवलकर यांचेहस्ते श्री देव विठ्ठलला श्रीफळ देऊन व श्रीफळ वाढवून करण्यात आला. या कार्यक्रमाला जैतापूरचे लोकनियुक्त सरपंच राजप्रसाद राऊत, उपसरपंच सौ.मिनल मांजरेकर, सदस्य दिवाकर आडविरकर, प्रदीप पाटील, मकरंद मांजरेकर, रमेश मांजरेकर, श्रीकृष्ण आडविरकर, रामदास मांजरेकर, श्रीमती गीता मांजरेकर तसेच वाडीतील ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत जैतापूरने देव विठ्ठल भक्तांसाठी चांगली सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच राजप्रसाद राऊत यांना धन्यवाद दिले.



