*हिरा प्रतिष्ठान संचलित अण्णासाहेब पी.के.पाटील विद्यालय, नंदुरबार येथे डॉ.रेखा चौधरी यांच्या संकल्पनेतून वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*हिरा प्रतिष्ठान संचलित अण्णासाहेब पी.के.पाटील विद्यालय, नंदुरबार येथे डॉ.रेखा चौधरी यांच्या संकल्पनेतून वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे उत्साहात साजरा*
*हिरा प्रतिष्ठान संचलित अण्णासाहेब पी.के.पाटील विद्यालय, नंदुरबार येथे डॉ.रेखा चौधरी यांच्या संकल्पनेतून वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे उत्साहात साजरा*
नंदूरबार(प्रतिनिधी):-हिरा प्रतिष्ठान संचलित सहकार महर्षी अण्णासाहेब पी.के.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नंदुरबार येथे ब्रँड अँबेसिडर डॉ.रेखा चौधरी यांच्या संकल्पनेतून 10 डिसेंबर 2025 बुधवार रोजी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक यांच्या अध्यक्षतेखाली वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीम. चेतना चौधरी यांनी विद्यार्थ्यांना वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे चे महत्त्व समजावतांना मोबाईल, संगणक, टॅब, इंटरनेट यांचा वाढता वापर आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सामाजिक जीवनावर, वर्तनावर, अभ्यासावर तसेच स्वास्थ्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डिजिटल साधनांचा संयमाने वापर करण्याचे आणि वास्तविक सामाजिक संपर्क वाढविण्याचे त्यांनी आवाहन केले. तद्नंतर मुख्याध्यापक अनिल चौधरी यांनी मनोगत व्यक्त करतांना तंत्रज्ञानाचा योग्य तिथे संतुलित व सकारात्मक वापर कसा करावा यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डिजिटल साधनांमध्ये अडकून न पडता खेळ, वाचन, कुटुंबीयांसोबत वेळ घालवणे, छंद जोपासणे यासारख्या गोष्टींकडे विद्यार्थ्यांनी अधिक लक्ष द्यावे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी डिजिटल डिटॉक्स डे प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल भदाणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नितीन साळी यांनी मानले. या प्रसंगी शाळेतील शिक्षक सुरेंद्र पाटील, विश्वास गायकवाड, सुधाकर सूर्यवंशी, श्रीमती उज्ज्वला चौरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी जितेंद्र चौधरी, शेखर पाटील, सुधाकर ठाकूर आणि रवींद्र चौधरी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.



