*रघुवंशी नर्सिंग महाविद्यालयात रेड रिबन क्लब (आर आर सी) स्थापना*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रघुवंशी नर्सिंग महाविद्यालयात रेड रिबन क्लब (आर आर सी) स्थापना*
*रघुवंशी नर्सिंग महाविद्यालयात रेड रिबन क्लब (आर आर सी) स्थापना*
नंदुरबार(प्रतिनिधी):- 6 डिसेंबर 2025 नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित, श्रीमती विमलताई बटेसिग रघुवंशी नसिग महाविद्यालयात एड्स जनजागृती सप्ताह निमित्त राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था नवी दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत रेड रिबन क्लबची स्थापना करण्यात आली. सदरील कार्यक्रमाचे आयोजन नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन आमदार चंद्रकांत रघुवंशी व व्हाईस चेअरमन मनोज रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथील एड्स नियंत्रण कक्षाचे सुभाष निकम व हरपाल जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार तालुका विधायक समितीचे समन्वय एम. एस. रघुवंशी प्रा. भूषण ठोंबरे प्राध्यापिका योगिनी सपकाळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने झाली. समुपदेशक सुभाष निकम यांनी एक दिनाची थीमचे अनावरण केले यावेळी त्यांनी क्लबचे महत्व व कार्यपद्धती उपस्थित आर आर सी क्लबच्या सदस्यांना समजावून सांगितले, यावेळी बीएससी नर्सिंग विद्यार्थ्यांनी एड्स जनजागृती पर पथनाट्य सादर केले तसेच पोस्टर्स स्पर्धेमध्ये नरसिंग विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उत्कृष्ट पोस्टरचे प्रदर्शन यावेळी करण्यात आले. समुपदेशक हरपाल जाधव यांनी नर्सिंग विद्यार्थ्यांना एक साधारण बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निराकरण त्यांच्या मार्फत करण्यात आले. प्राध्यापक भूषण ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे महत्त्व स्वागत केले व आर आर सी क्लबच्या 15 सदस्य टीमचे त्यांनी यावेळी स्वागत केले व विद्यार्थ्यांना पियर ग्रुप एज्युकेशन च्या मार्फत एड्स जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्ष बीएससी नर्सिंग विद्यार्थिनी विद्या पावरा यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप वसावे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे आर आर सी समन्वयक भूषण वाळू यांनी कामकाज बघितले तसेच शिक्षकेतर कर्मचारी अशोक धोबी आका शिंदे विवेक मराठे अमोल गवळी व कल्पना चौधरी यांनी विशेष सहकार्य केले.



