*पथराई येथे डीपी गावित आयुर्वेद महाविद्यालयात शिष्योपनयन सोहळा व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पथराई येथे डीपी गावित आयुर्वेद महाविद्यालयात शिष्योपनयन सोहळा व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत*
*पथराई येथे डीपी गावित आयुर्वेद महाविद्यालयात शिष्योपनयन सोहळा व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-डी. पी. गावित आयुर्वेद महाविद्यालय, नंदुरबार येथे ‘शिष्योपनयन संस्कार’ सोहळ्यात नवीन BAMS बॅचचे मनोभावे स्वागत. नंदुरबार तालुक्यातील पथराई येथील डी. पी. गावित आयुर्वेद महाविद्यालय येथे नवीन BAMS बॅचच्या स्वागतार्थ भव्य ‘शिश्योपनयन संस्कार व स्वागत समारंभ’ उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शिरीष कुमार शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नरेश पाडवी, डॉ. राजेश वसावे, चेअरमन राजेंद्रकुमार गवित, संचालिका डॉ. विभूती गवित, डॉ ऋषिका गावित , प्राचार्य डॉ. समीर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की, सीनियर बॅचनं अतिशय उत्कृष्ट व सुसंघटित पद्धतीने नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करीत संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. हा संपूर्ण सोहळा डॉ. सुदर्शना वाल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाला एक वेगळेच शैक्षणिक व संस्कारप्रधान स्वरूप प्राप्त झाले.
यावेळी अकॅडमी हेड, शिक्षकवर्ग, तसेच हॉस्पिटल स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन विद्यार्थ्यांना आयुर्वेद शिक्षणातील शिस्त, संस्कार, दायित्व, आणि चिकित्सकीय दृष्टिकोन यांचे महत्त्व ‘शिश्योपनयन’ या पारंपरिक विधीद्वारे समजावून सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी नवीन विद्यार्थ्यांचा उत्साह आणि वरिष्ठ विद्यार्थ्यांची आयोजन क्षमता पाहून सर्व मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.



