*जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवात श्रॉफ हायस्कूलचे उल्लेखनीय कामगिरी नोंदवत तीन विविध कलाक्षेत्रांमध्ये यश
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवात श्रॉफ हायस्कूलचे उल्लेखनीय कामगिरी नोंदवत तीन विविध कलाक्षेत्रांमध्ये यश
*जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवात श्रॉफ हायस्कूलचे उल्लेखनीय कामगिरी नोंदवत तीन विविध कलाक्षेत्रांमध्ये यश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-बालरंगभूमी परिषद, मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘जल्लोष लोककलेचा –2025’ या जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवात श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल नंदुरबार यांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवत तीन विविध कलाक्षेत्रांमध्ये यश संपादन केले. शाळेच्या एकल वाद्य, समूह नृत्य व समूह गायन या तिन्ही विभागांतील चमकदार कामगिरीमुळे श्रॉफ हायस्कूलने जिल्हास्तरावर आपली सांस्कृतिक ओळख अधिक भक्कम केली आहे.
संगीत क्षेत्रातील एकल वाद्य प्रकारात शाळेचा विद्यार्थी चि. शुभम दीपक निर्मल याने तंत्रशुद्ध, लयबद्ध आणि प्रभावी सादरीकरण करीत सर्वोत्कृष्ट (प्रथम) क्रमांक पटकावला. शुभमच्या यशामागे हेमंत पाटील यांचे संयोजित, परिपूर्ण आणि कलात्मक मार्गदर्शन महत्वाचे ठरले. समूह नृत्य प्रकारात शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या आकर्षक, सुसूत्र आणि प्रभावी लोकनृत्याला परीक्षकांकडून उच्च स्तरीय प्रशंसा मिळत उत्कृष्ट (द्वितीय) क्रमांक प्राप्त झाला. या विजयी पथकातील विद्यार्थिनी पुढीलप्रमाणे –
ईश्वरी शरद डोईफोडे, धनश्री नरेश जिनगर, प्रिती हिरामण बोरसे, निधी ज्ञानेश्वर सावंत, नेहा ज्ञानेश्वर सावंत, साची विजय शिरसाठ, समृद्धि भरत नाईक, अदविका सुनिल मोरे, चेतना अनिल अहिरे आणि लावण्या प्रसाद माळी. या संपूर्ण कलास्पर्धेला सुनिल गिरासे यांचे नृत्यरचना, तालमीची दिशा आणि मंच सादरीकरणातील मार्गदर्शन मोलाचे ठरले. यासोबतच समूह गायन प्रकारात शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वर, लय आणि भावपूर्ण सादरीकरणाची सांगड घालत प्रशंसनीय (चौथा) क्रमांक पटकावला. या पथकातील विद्यार्थ्यांची नावे – उत्कर्ष नितीन सोनवणे, दिशा छोटू माळी, श्रेया रविंद्र सोनवणे, आरोही राजेंद्र कुलकर्णी, छावणी ज्ञानेश्वर चौधरी, गौरव भरत चव्हाण, जयेश शरद पाटील, जयदीप सचिन महाजन, पूरब विजय पवार आणि रितेश प्रमोद पाटील. या पथकाला देखील हेमंत पाटील सरांचे उत्कृष्ट संगीत प्रशिक्षण लाभले. या त्रियशाचे औचित्य साधत मुख्याध्यापिका सौ. सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षक भिकू त्रिवेदी, पर्यवेक्षिका सौ.सीमा पाटील तसेच संपूर्ण शालेय परिवार यांनी विजयी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे आणि स्पर्धा तयारीत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांची मेहनत, शिस्त, कलासक्ती आणि शिक्षकांचे समर्पणपूर्वक मार्गदर्शन यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हे यश शक्य झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. शाळेच्या या त्रि-यशामुळे सांस्कृतिक क्षेत्रातील शाळेची गुणवत्ता आणि सातत्यपूर्ण प्रगती अधोरेखित झाली असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही नवे उंची गाठाव्यात अशा शुभेच्छा शैलेय परिवाराने दिल्या.



