*जी.टी.पाटील महाविद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी.टी.पाटील महाविद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन*
*जी.टी.पाटील महाविद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन*
नंदुरबार(प्रतिनिधी):नंदुरबार येथील जी. टी.पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात भारताचे महान विचारवंत, संविधान निर्माता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रम अत्यंत श्रद्धाभावाने संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एम. जे. रघुवंशी यांनी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. यावेळी त्यांनी डॉ. आंबेडकरांचे समाज बदलणारे विचार, संविधान निर्मितीतील त्यांचे योगदान आणि समतेच्या मूल्यांवर उभारलेले कार्य आजही देशाला दिशा देणारे असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमात डॉ. डी. बी. देवरे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या बहुआयामी कार्याचा विस्तृत आढावा घेत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राष्ट्रनिर्मितीतील कार्याला उजाळा दिला. यावेळी उपप्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोज शेवाळे यांनी कौशल्यपूर्णरीत्या केले, तर आभार प्रदर्शन प्रा. संदीप बडगुजर यांनी मानले. कार्यक्रम संयोजनासाठी डॉ.उपेंद्र धगधगे, प्रा. पी.सी.भील, प्रा. हर्षबोध बैसाणे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले.



