*डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 69 वा महापरिनिर्वाण दिन साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 69 वा महापरिनिर्वाण दिन साजरा*
*डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 69 वा महापरिनिर्वाण दिन साजरा*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे मुख्याध्यापक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास मगरे होते. तर प्रमुख वक्ते तुकाराम भील, राजेंद्र ढोडरे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे
मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख वक्ते तुकाराम भील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांनी भारतीय संविधान लिहून देशातील वंचित घटकांना न्याय दिला
व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात
आणले आहे असे सांगितले. तसेच प्रमुख वक्ते राजेंद्र ढोडरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष
त्यांचे योगदान आणि आधुनिक भारताविषयी त्यांचे विचार, यांची धोरणे याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास मगरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
होते. जगातल्या सर्व क्षेत्राचे त्यांना
अभ्यास होता. समाजकारण, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान यासर्व विषयाचा त्यांचा गाढा
अभ्यास होता. म्हणून एवढे उत्कृष्ट
संविधान त्यांच्या हातून निर्माण झाले.
असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल साळुंखे यांनी केले तर आभार पंकज खेडकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुदाम
जांभोरे, संदीप मोरे, विलास पाडवी,
संतोष राठोड मोहन वळवी आणि सुबोध जावरे यांनी परिश्रम घेतले.



