*रामपूर शिवारातून 14 लक्ष 40 सीलबंद बाटल्या व सहा लाखांचे पिकप वाहनासह 20 लक्ष 40 हजारांचा मुद्देमाल जप्त*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रामपूर शिवारातून 14 लक्ष 40 सीलबंद बाटल्या व सहा लाखांचे पिकप वाहनासह 20 लक्ष 40 हजारांचा मुद्देमाल जप्त*
*रामपूर शिवारातून 14 लक्ष 40 सीलबंद बाटल्या व सहा लाखांचे पिकप वाहनासह 20 लक्ष 40 हजारांचा मुद्देमाल जप्त*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहादा तालुक्यातील म्हसावद- धडगाव रस्त्यावर रामपूर शिवारात राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने टाकलेल्या धाडीत सुमारे 14 लक्ष 40 हजारांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी मद्यसाठ्यासह वाहन असा सुमारे 20 लक्ष रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क, खेडदिगर सीमा तपासणी नाका व दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क २ यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने सापळा रचून म्हसावद- धडगाव रस्त्यावर रामपूर शिवारात कारवाई करत पिकअप वाहन (क्र.एमएच 39 एडी 1714) त्यात रॉयल ब्लू व्हीस्कीच्या गोवा राज्यात निर्मित सुमारे 14 लक्ष 40 हजारांच्या सिलबंद बाटल्या व सहा लाखांचे पिकअप वाहन असा सुमारे 20 लक्ष 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादनकडून प्राप्त झाली आहे. मध्य प्रदेश व महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दररोज कोट्यवधी रुपयांचा मद्यसाठ्याची अवैधरित्या वाहतूक करण्यात येते. असे असतांना राज्य उत्पादन शुल्काच्या वतीने करण्यात येणाऱ्या तोकड्या कारवाईंमुळे या भागात मद्यमाफिया सक्रीय झाला असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येते. असे असतांना संबंधित विभागाकडून पाहिजे त्या प्रमाणात कारवाई करण्यात येत नसल्यानेदेखील नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हाभरात बहुतेक ठिकाणी राज्य उत्पादनच्या दुर्लक्षामुळेच अवैधरित्या मद्य विक्रीदेखील होत असल्याचे दिसून येते. यामुळे सदरची बाब गांभीर्याने घेवून राज्य उत्पादनकडून कारवाईंमध्ये सातत्य असण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.



