*नरसीत लाईनमनच्या घरी चोरी अठ्यांशी हजाराचा ऐवज लंपास तर लॉटरी दुकानावर स्थागुशा पथकाचा छापा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नरसीत लाईनमनच्या घरी चोरी अठ्यांशी हजाराचा ऐवज लंपास तर लॉटरी दुकानावर स्थागुशा पथकाचा छापा*
*नरसीत लाईनमनच्या घरी चोरी अठ्यांशी हजाराचा ऐवज लंपास तर लॉटरी दुकानावर स्थागुशा पथकाचा छापा*
नरसी(प्रतीनिधी):-येथील पोलीस चौकी पासून जवळच असलेल्या दत्तनगर नरसी (ता.नायगांव जि. नांदेड) येथील वीज कर्मचारी प्रमोद मारोती चिवळे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील नगदी रक्कम व सोन्याचे दागिने चोरून पोबारा केल्याची घटना 2 डिसेंबरच्या रात्री घडली. सदरील घटनेबाबत अधिकची माहिती अशी की प्रमोद चिवळे हे घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गावी गेले असता घरी कोणी नसल्याचा संधान साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले आणि कपाट उचकावून कपाटातील नगदी चाळीस हजार रुपये आणि एक तोळ्याची सोन्याची पोत एकूण 88000 रुपयांचा मुद्देमाल चोरून पसार झाले याप्रकरणी घरमालक प्रमोद शिवाळे यांच्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात 305 / 331(4), 331(3) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास बीट जमादार एच. सी. सोनकांबळे यांच्यामार्फत सुरू असल्याची माहिती माहिती देण्यात आली आहे. नरसी बसस्थानका जवळील लॉटरी सेंटरवर स्थागुशा पथकाचा छापा नुकतेच रामतीर्थ पोलीस ठाण्यात झालेल्या एसीबी कारवाईनंतर येथील पोलीस ठाण्याला पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांना धाडण्यात आले त्यांनी नरशी चौकातील फूटपाथ रिकामे करण्यासाठीच आपली प्रतिष्ठा पणाला लावली असल्याचे आढळून आले मात्र येथील बसस्थानकाच्या बाजूला बेकायदेशीरपणे चालणाऱ्या लॉटरी सेंटरवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली असल्यामुळे या भागाला नव्याने नियुक्त झालेले पोलीस अधिकारी या रामतीर्थ पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी काय भूमिका घेतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान काल चार डिसेंबर रोजी गुरुवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांच्या पथकाने येथील बसस्थानकाच्या बाजूला बेकायदेशीरपणे चालणाऱ्या लॉटरी सेंटरवर छापा टाकून अठरा हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला यामध्ये नगदी 1730 आणि संगणक, प्रिंटर, सीपीयु आदी साहित्य जप्त केल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी स्वतः नागनाथ तुकडे (पोलीस उपनिरीक्षक स्थागुशा नांदेड) यांच्या फिर्यादी वरून लाटरी दुकानदार भीमराव मोहन वाघमारे व एकनाथ गंगाधर चोपवाड यांच्या विरोधात 393 /25 कलम 12 (अ ) 394 लॉटरी अधिनियम 1998 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नरसी भागाचे बीट जमादार एच.सी. सोनकांबळे यांच्याकडे असल्याची माहिती देण्यात आली आहे . एकंदरीत परिस्थितीचा विचार करता पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांनी रामतीर्थ पोलीस ठाण्याला सक्षम पोलीस अधिकारी द्यावा अशी मागणी सुजान केली जात आहे.



