*दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक शस्त्रांचे भव्य प्रदर्शन!,‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त होणार ‘शौर्याचा शंखनाद’*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक शस्त्रांचे भव्य प्रदर्शन!,‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त होणार ‘शौर्याचा शंखनाद’*
*दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक शस्त्रांचे भव्य प्रदर्शन!,‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त होणार ‘शौर्याचा शंखनाद’*
नवी दिल्लीतील (प्रतिनिधी):-प्रतिष्ठित ‘भारत मंडपम्’ (इंद्रप्रस्थ) येथे 13 ते 15 डिसेंबर रोजी आयोजित होत असलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सुमारे 250 हून अधिक दुर्मिळ आणि ऐतिहासिक शस्त्रे दिल्लीमध्ये प्रदर्शित होत आहेत. ही सर्व शस्त्रे महाराष्ट्रातून विशेष सुरक्षा व्यवस्थेत दिल्लीला आणली जात असून राजधानीत अशा ऐतिहासिक स्वरूपाचे शस्त्रप्रदर्शन पाहायला मिळणार आहे. ‘सेव्ह कल्चर, सेव्ह भारत फाउंडेशन’ प्रस्तुत आणि सनातन संस्था आयोजित महोत्सवात या शिवकालीन शस्त्रप्रदर्शनाद्वारे ‘शौर्याचा शंखनाद’ होणार आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते अभय वर्तक यांनी दिली आहे. सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने देशाच्या राजधानीत होणाऱ्या महोत्सवात दिनांक 13 ते 15 डिसेंबर या तीन दिवसांच्या ‘स्वराज्याचा शौर्यनाद’ या नावाचे भव्य प्रदर्शन लावण्यात येणार आहे. हे प्रदर्शन हॉल क्रमांक 12 मध्ये सर्वांसाठी खुले राहील. या प्रदर्शनीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हाताळलेल्या अनेक शस्त्रांचे साक्षात दर्शनही घेता येईल. यासमवेतच अन्य मराठा साम्राज्यातील सेनापतींनी चालवलेली शस्त्रे असणार आहेत. त्यात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा भाला यांसारखी विविध शस्त्रे असतील. तसेच महाराणा प्रताप यांच्या काळातील शस्त्रांसह कर्नाटकातील विजयनगर साम्राज्यकालीन तलवारी, शिवकालीन युद्धपरंपरा, धातूशास्त्र, ‘लोखंड ते शस्त्र’ या संकल्पनेवर आधारित मराठा शस्त्रनिर्मिती प्रक्रिया आणि मराठा सामरिक बुद्धिमत्तेचे दर्शन यांचा समावेश असेल. तसेच हिंदू स्त्रियांनी आत्मरक्षणासाठी वापरलेल्या शस्त्रांचेही प्रदर्शन होणार असून त्या काळातील स्त्रियांची रणशक्ती आणि युद्धातील भूमिका अधोरेखित केली जाणार आहे. हे केवळ प्रदर्शन नसून हिंदवी स्वराज्याच्या तेजातून ‘सनातन राष्ट्रा’ची नवी प्रेरणा देणारा आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अनुभव ठरणार आहे. या महोत्सवात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्यासह अनेक संत-महंत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच केंद्रीय पर्यटन व संस्कृती मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ, दिल्लीचे सांस्कृतिक मंत्री कपिल मिश्रा, छत्रपती खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले, अधिवक्ता विष्णू जैन यांसह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा केवळ कार्यक्रम नसून राष्ट्ररक्षण, संस्कृती, शौर्य आणि हिंदवी स्वराज्याच्या तेजाचे पुनरुज्जीवन आहे. आजच्या काळातील विविध सुरक्षा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर शिवकालीन शस्त्रे, युद्धकला आणि राष्ट्रधर्म यांची आठवण तरुणांना नवचैतन्य देणारी ठरेल. सर्व हिंदूंसाठी हा महोत्सव विशेष अभिमानाचा क्षण आहे. हा महोत्सव पाहण्यासाठी व यात सहभागी होण्यासाठी SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी, असे आवाहन असेही अभय वर्तक यांनी केले आहे.



