*जी. टी. पाटील महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी. टी. पाटील महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम संपन्न*
*जी. टी. पाटील महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील जी. टी. पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी पुण्यतिथी तसेच ‘लेवा गणबोली दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. साहित्य, संस्कृती आणि गणबोली जपण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात बहिणाबाईंच्या जीवनकार्याचा आढावा घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एम. जे. रघुवंशी होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बहिणाबाई चौधरी यांचे जीवन संघर्षमय असले तरी त्यातून त्यांनी निर्माण केलेली काव्यसंपदा ही समाजाला जीवनतत्त्वज्ञान देणारी असल्याचे सांगितले. “एक निरक्षर स्त्री पुढे जाऊन तत्त्ववेत्ता बनते आणि खानदेशाचे रत्न ठरते, हे बहिणाबाईंच्या काव्यातून दिसून येते,” असे त्यांनी नमूद केले.
प्रमुख वक्ते डॉ. माधव कदम यांनी बहिणाबाईंच्या ओवी, काव्यशैली व जीवनातील संघर्षांवर प्रकाश टाकला. युवकांनी आणि स्त्रियांनी त्यांच्या काव्यातून प्रेरणा घेऊन जीवनात सकारात्मकता निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थी दिव्यश पाटील यांनी कवयित्री बहिणाबाईंच्या काव्याबद्दल मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोज शेवाळे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. सुलतान पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. रुपेश देवरे, डॉ. सविता पटेल, प्रा. संगीता पिंपरे, प्रा. विलास पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
हा कार्यक्रम मराठी विभाग, विद्यार्थी कल्याण विभाग, तसेच राष्ट्रीय सेवा योजना (कनिष्ठ व वरिष्ठ विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांचे उत्स्फूर्त सहकार्य लाभले.



