*माय राजापूर संस्थेचा राजापूर साईनगर येथील करंबेळकर कुटुंबियांना मदतीचा हात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माय राजापूर संस्थेचा राजापूर साईनगर येथील करंबेळकर कुटुंबियांना मदतीचा हात*
*माय राजापूर संस्थेचा राजापूर साईनगर येथील करंबेळकर कुटुंबियांना मदतीचा हात*
राजापूर(प्रतिनिधी):-समाज हाच देव, सेवा हीच भक्ती या जाणिवेतून माय राजापूर संस्था काम करत असते. शेती, फलोत्पादन आणि पर्यटन या त्रिसूत्रीने कोकणी माणसाचा शाश्वत विकास होऊ शकतो. कोकणी माणूस स्वत:च्या मेहतीवर, कष्टावर स्वाभिमानी जीवन जगू शकतो या विश्वासावर माय राजापूर संस्था काम करत असते. संस्थेचे वरील मुख्य उद्दिष्ट असले तरी अनाथ, अपंग, गरजू गरीब माणसांना संस्थेच्या कुवतीप्रमाणे सणा- सुदीला किराणा सामान देणे, आपत्कालीन स्थितीत आर्थिक मदत करणे अश्या प्रकारचे मदत कार्यही करते. राजापूर साईनगर येथील तेजस करंबेळकर याचा 18 नोव्हेंबर 2025 रोजी कावीळ आजाराने आकस्मिक मृत्यू झाला आणि त्यांच्या कुटुंबावर, पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती कमजोर असल्याने माय राजापूर सदस्या सौ दिपाली पंडित यांनी ग्रुपवर मदतीचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला माय राजापूर सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे चांगला मदतनिधी जमा झाला. जमा झालेला निधी आणि त्यात संस्थेच्या गंगा जळीतील थोडी रक्कम घालून पंचवीस हजार रुपयांची मदत करंबेळकर कुटुंबीयांना गुरुवार दि.27 नोव्हेंबर 2025 रोजी देण्यात आली. पंचवीस हजार रुपयाचा धनादेश माय राजापूर संस्थेच्या जिजाऊ श्रीमती प्रणोती भोसले आणि जेष्ठ सदस्य नित्यानंदजी पाटील यांच्या हस्ते शरद रामचंद्र करंबेळकर यांच्याकडे देण्यात आला. याप्रसंगी संदीप देशपांडे, जगदीश पवार, नित्यानंद पाटील, श्रीमती प्रणोती भोसले, प्रदीप कोळेकर, हृषिकेश कोळेकर हे माय राजापूर सदस्य उपस्थित होते. ही मदत स्विकारताना शरद करंबेळकर हे खूप भावूक झाले होते. त्यांनी सद्गगतीत अंत: स्करणाने माय राजापूर संस्थेचे आभार मानले.



