*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती अंगणवाडी कर्मचारी प्रतिनिधिंचे 13 डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथे धरणे आंदोलन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती अंगणवाडी कर्मचारी प्रतिनिधिंचे 13 डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथे धरणे आंदोलन*
*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती अंगणवाडी कर्मचारी प्रतिनिधिंचे 13 डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथे धरणे आंदोलन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती अंगणवाडी कर्मचारी प्रतिनिधिंचे 13 डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथे धरणे आंदोलन, शनिवार
सकाळी 11.00 वाजता विधानसभा परिसर, यशवंत स्टेडीयम, धनतोली नागपूर येथे अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींचे राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या राज्य शासनाने तात्काळ सोडवाव्यात यासाठी समन्व्यय समितीच्या नेतृत्वाखाली नागपूर विधानसभा हिवाळी अधिवेशन काळात अंगणवाडी कर्मचारी प्रतिनिधी धरणे आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधणार आहेत. यात अंगणवाडी सेविका मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना वेतन व भत्ते लागू करण्यात यावे. केंद्र सरकारने महागाईचा विचार करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ करावी. सेविका मदतनीसांना कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता न देता दरमहा मानधनाला सरसकट जोडण्यात यावा. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका मदतनीसांना ग्रॅच्युटी लागू करावी. अंगणवाडी सेविका मदतनीसांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन लागू करावी. FRS करतांना सेविकांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्यात याव्यात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामाचा थकीत मोबदला अदा करावा. अंगणवाडी सेविका मदतनीसांना पंधरा दिवसांऐवजीएक महिना उन्हाळी सुट्टी देण्यात यावी. याप्रमुख मागण्यांसह अन्य मागण्या सोडविण्यासाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटनांची राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन केली आहे. सदर समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे प्रतिनिधिचे धरणे आंदोलन आयोजित केले आहे. तरी सदर धरणे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन युवराज बैसाणे, रामकृष्ण बी.पाटील, राजू पाटील, अमोल बैसाने, वकील पाटील यांनी केले आहे, नागपूर येथील धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.



