*कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका राजापूर आयोजित सभेत विविध विषयांवर सखोल चर्चा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका राजापूर आयोजित सभेत विविध विषयांवर सखोल चर्चा*
*कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका राजापूर आयोजित सभेत विविध विषयांवर सखोल चर्चा*
मुंबई(प्रतिनिधी):-कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुक राजापूरचे खजिनदार कै.सोनू ठुकरूल यांच्या आकस्मित निधनाने रिक्त झालेल्या जागी जयवंत नाचणेकर (मौजे अणसुरे) यांची खजिनदार पदी बिनविरोध निवड करण्यात आली तर सहसचिव पदी देवेंद्र पेटावे (मौजे. कशेळी) यांची निवड करण्यात आली तसेच संघप्रतिनिधी मंडळ सदस्य पदी चंद्रकांत लिगम (मौजे फुपेरे) यांची निवड करण्यात आली. बुधवार दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका राजापूरची विशेष सर्वसाधारण सभा शाखाध्यक्ष शिवाजी तेरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती, सदर सभेत अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
सन 2026 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात करण्याचे निश्चित करण्यात आले.
दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईत समाजाच्या वतीने काढलेल्या भव्य ओबीसी कुणबी एल्गार मोर्चाबाबत झालेल्या जमा खर्चाचे वाचन करून मंजुरी देण्यात आली. तसेच संघामार्फत सर्व शाखांना सूचित करण्यात आल्याप्रमाणे कुणबी आरक्षण अभाधित ठेवण्यासाठी नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात कुणबी (ओबीसी) समाजाच्याबाजूने आवाज उठविण्यासाठी प्रत्येक शाखांनी आपआपल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधि आमदाराना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. (कुणब्यांची वारी आमदारांच्या दारी), नागपूर येथे 8 डिसेंबर रोजी सुरु होत असणाऱ्या हिवाळी अधिवेशनात शासनाने कुणबी समाजाविरोधात काढलेल्या जीआर ला प्रखर विरोध करण्यासाठी पुन्हा एकदा नागपूर अधिवेशनात मोर्चा काढून धडक देण्याचे निश्चित करण्यात आले त्याबाबत सविस्तर माहिती लवकर दिली जाईल. शासनाने मराठा समाजाला कुणबी प्रमाण पत्र देण्याबाबत काढलेल्या शासन निर्णया विरोधात कुणबी समाज जसे रस्त्यावर लढा देत आहे तसेच न्यायालयीन लढा देखील लढत असून त्यासाठी लागणार निधी प्रत्येक समाज बांधवानी शाखेकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. शाखा, पत संस्था, शिक्षण संस्था, युवक मंडळ तसेच महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच कौटुंबिय स्नेह मेळावा आयोजित करण्याबाबत युवक मंडळाने नियोजन करून शाखेला कळवावे असे ठरविण्यात आले.



