*रिजनल टीचर्स ऑर्गनाझेशनतर्फे गुणवंताचा गौरव*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रिजनल टीचर्स ऑर्गनाझेशनतर्फे गुणवंताचा गौरव*
*रिजनल टीचर्स ऑर्गनाझेशनतर्फे गुणवंताचा गौरव*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हयातील " रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन दापोली जिल्हा शाखा नंदुरबार " या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय "अध्यक्ष संजय काशिद " यांच्या प्रेरणेतून जिल्हा शाखा नंदुरबार संघटनेतर्फे विद्यार्थी, शिक्षक यांचे हित लक्षात घेऊन पर्यटन व पर्यावरण, युवकांमध्ये देशभक्ती, आदरभाव आत्मविश्वास, सर्जनशीलता, सर्वांगिण विकासासाठी भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जन्मदिन व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मदिना निमित्ताने वेशभूषा, चित्रकला, निबंध स्पर्धा घेतल्या होत्या. यात 500 हून अधिक विद्यार्थांनी सहभाग नोंदवला होता. यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुण गौरवासाठी बक्षिस समारंभाचे अभिनव विद्यालय नंदुरबार येथे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे " अध्यक्ष जितेंद्र बोरसे प्रमुख पाहुणे रंजना बोरसे (अध्यक्ष लायन्स फेमिना क्लब) सुरेखा वळवी (खजिनदार), रागिणी पाटील (जिल्हा समन्वयक), तारकेश्वर पटेल (प्राचार्य, अभिनव विद्यालय नंदुरबार), चेतना गोसावी जिल्हा अध्यक्षा RTO सुनंदा तांबोळी (मुख्याध्यापिका, लाडकोरबाई विद्यालय शहादा), श्रीमती एम. एम. वळवी (ऍग्रीकल्चर हायस्कूल खांडबारा), जितेंद्र बोरसे (राज्य सचिव, जिल्हाध्यक्ष), रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन संघटनेतील जिल्हा, तालुका शाखेतील पदाधिकारी, जिल्हयातील यशस्वी शाळेतील मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सर्वांच्या चेहर्यावर यशाचा आनंद ओसंडून वाहतांना दिसत होता. प्रथम अभिनव विद्यालय नंदुरबार येथील प्रारंगणातील " वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार " अर्पण करण्यात आला. नंतर धरती आबा " बिरसा मुंडा " व भारताचे पहिले पंतप्रधान " पंडित नेहरु " यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हयाभरातून आलेल्या प्रमुख पाहुणे, सर्व सहभागी शाळेच्या मुख्याध्यापकांचे गुलाबपुष्प, ट्रॉफी नॅपकीन देऊन सन्मान करण्यात आला. याप्रंसगी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा रोझवा पुर्नवसन क्रं.4 ता. तळोदा जि नंदुरबार या शाळेच्या विद्यार्थीनींनी " आदिवासी पहचान नृत्य " करुन मन मंत्रमुग्ध करुन टाकले. सर्वांनी त्यांचे कौतुक करुन प्रेरणा दिली. संघटनेच्या वतीने करणसिंग वळवी, ब्रम्हानंद वळवी, संदीप मोरे, शेखर धनगर, अविनाश कोकणी, तिलोत्तमा चौधरी, सविता पाटील, वाघ मॅडम यांना नवीन नियुक्त पदाधिकारी म्हणून नियुक्तीपत्र सन्मानाने बहाल करण्यात आले.
रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन संघटनेकडून घेण्यात आलेल्या निबंधस्पर्धा प्रकारात प्रथम गटात यशस्वी तवर प्रथम, प्रज्ञा पावरा व्दितीय, सावंत पाडवी तृतीय, उत्तेजनार्थ प्रतिक्षा पावरा. व्दितीय गटात दक्षता पावरा प्रथम, यश सोनवणे व्दितीय, दिव्यांनी पवार तृतीय, उत्तेजनार्थ दक्ष चौधरी तृतीय गटात दिपाली सोनवणे प्रथम, सिमरन पठाण व्दितीय, गौरव ठाकरे तृतीय उत्तेजनार्थ गितेश पाटील चित्रकला स्पर्धेत प्रथम गटात आहाना वढाई प्रथम, तनिष्का वळवी व्दितीय, हर्ष कोकणी तृतीय उत्तेजनार्थ दिपाली वळवी, इमा पावरा व्दितीय गटात आलिया पटवे प्रथम, वेदिका तायडे व्दितीय, देवयानी कुवर तृतीय, उत्तेजनार्थ वैष्णवी पाटील, दुर्गा गावीत, छगन पाटील तृतीय गटात आरुषी बागूल प्रथम, गोशिया नाज शेख व्दितीय, रोशनी मराठे तृतीय, उत्तेजनार्थ मानव सोनवणे वेशभूषा स्पर्धेत अनुश्री जळोदकर, प्रियांश पाटील प्रथम, दिशा गावीत, रोशन वळवी व्दितीय, कार्तिक पावरा, हर्षाली वळवी तृतीय उत्तेजार्थ मोक्षदा पाटील व्दितीय गटात अश्विनी पावरा प्रथम, अर्णव पाटील व्दितीय, कल्याणी गिरासे तृतीय उत्तेजनार्थ चिन्मय तांबोळी तृतीय गटात हर्षदा खारकर प्रथम, मयुरी पाटील व्दितीय, विशाखा पाटील तृतीय. मिळविलेल्या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश मलखेडे जिल्हा उपाध्यक्ष तथा राज्य प्रदेश समन्वयक यांनी करून संघटनेची माहिती दिली, सुत्रसंचालन तिलोत्तमा चौधरी तर आभार संदीप मोरे यांनी मानले. आर.टी.ओ . नंदुरबार अध्यक्ष " जितेंद्र बोरसे" यांनी अध्यक्षीय भाषणातून आपल्या विचारातून प्रेरणा दिली. अनेकांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी सुनिल पाटील, अमरसिंग ठाकरे, छोटू कणखर, प्रकाश ठाकरे, अमृतसिंग राजपूत, विशाल बागूल, रमेश कोठारी, संतोष पाडवी, अविनाश कोठारी, सोन्या पाडवी, जयवंती चौधरी, भारती चव्हाण, कमल पवार, योगेश पाटील, संदीप भावसार, ज्योती लष्करी, अरविंद वसावे, रत्नदीप रामराजे, विशाल बागूल, सतिष बाविस्कर यांनी अधिकचे परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडून विद्यार्थ्यांना प्रेरणेची ऊब दिली.



