ताजा खबरे:
*रावल बी एड महाविद्यालयात एड्स दिन साजरा*
*डोळे अंधारात, पण पाऊल प्रकाशात !दिव्यांग मुलगा आणि दृष्टिहीन आईने उजळवला लोकशाहीचा दीप*
*कृष्ण औद्योगिक वसाहतीच्या शिवारात बिबट्याने तरुणावर केला हल्ला,परिसरात खळबळ*
*राकसवडे येथे मोफत संगणक वर्गाचे उद्घाटन*
*उपनगर व तळोदा हद्दीतील घरफोडीचे 2 गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*डोळे अंधारात, पण पाऊल प्रकाशात !दिव्यांग मुलगा आणि दृष्टिहीन आईने उजळवला लोकशाहीचा दीप*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*डोळे अंधारात, पण पाऊल प्रकाशात !दिव्यांग मुलगा आणि दृष्टिहीन आईने उजळवला लोकशाहीचा दीप*

  • Share:

*डोळे अंधारात, पण पाऊल प्रकाशात !दिव्यांग मुलगा आणि दृष्टिहीन आईने उजळवला लोकशाहीचा दीप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आज राज्यभर नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मतदानासाठी शासकीय सुट्टी असली तरी निवडणुकीचं कर्तव्य हा माझ्या कामाचा श्वास असल्यामुळे, मतदानाची खबरबात मीडियापर्यंत पोहोचवण्यासाठी मी पहाटेपासूनच “खबरदार” होतो.
सकाळ उगवली ती अगदी निवांत शांततेने. सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापना, दुकाने, स्टॉल, टपऱ्या… जणू सुटीची ऊब अंगावर घेत त्यांनी आपले दरवाजे अलगद लपेटून ठेवले होते. या निवांत शहरातून फिरताना काही मतदान केंद्रांवर उमटणारा मतदारांचा उत्साह मात्र मनाला ऊर्जा देणारा होता. याच वातावरणात एक प्रसंग अचानक नजरेसमोर आला आणि क्षणभर मन थांबूनच राहिलं… एक दिव्यांग मुलगा, नवनाथ उत्तम भोई, आपल्या दृष्टीहीन आईचा हात अलगद धरून तिला मतदानासाठी घेऊन जात होता. दैनंदिन संघर्षाच्या सावल्या झेलत जगणाऱ्या श्रीमती सखुबाई उत्तम भोई, आणि तिला आधार देत लोकशाहीच्या मंदिरात नेत असलेला तिचा मुलगा, हे दृश्य मनाला हेलावून टाकणारं होतं, आणि त्याचवेळी आमच्यासारख्या सक्षम व सुशिक्षित लोकांच्या अंतर्मनातील अंधारात प्रकाश पाडणारंही. कारण इथे फक्त मतदान नव्हतं; इथे कर्तव्याचा हात आणि विश्वासाची बोटं एकत्र येऊन लोकशाहीचा सर्वात सुंदर अर्थ प्रकट करत होती. त्या एका क्षणात जाणवलं,
लोकशाहीची खरी शक्ती मोठ्या सभा आणि गर्दीत नाही, तर अशा साध्या, नि:शब्द, ममता आणि कर्तव्याच्या भारलेल्या पावलांत उमटत असते. भारताची राज्यघटना तयार होत असताना घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एक ठाम भूमिका होती, भारतातील प्रत्येक नागरिकाला, तो गरीब असो की श्रीमंत, शिक्षित असो की अशिक्षित, दिव्यांग असो वा दुर्बल, समान मतदानाचा हक्क मिळालाच पाहिजे. त्या काळात काही जणांचा आग्रह होता की मतदानाचा अधिकार फक्त “मर्यादित” आणि “सुशिक्षित” लोकांनाच द्यावा. अशिक्षित लोकांना मतदानाचा अर्थच कळत नाही असा त्यांचा दावा होता. परंतु असा निर्णय झाला असता, तर देशातील मतदानाची टक्केवारी कदाचित 30-40 टक्क्यांवरच राहिली असती आणि लोकशाहीची मुळेच कमकुवत झाली असती. आज यातील विपरीत वास्तव असे की, ज्यांच्यासाठी हा विशेष हक्क राखून ठेवावा असे काहींचे मत होते, तेच सुशिक्षित लोक मतदानाच्या दिवशी घरी बसून राहतात. उलट, ज्यांना हा अधिकार देणे घातक ठरेल असे मानले गेले होते, ते गरीब, अशिक्षित आणि दुर्बल नवनाथ उत्तम भोई आणि  श्रीमती सखुबाई उत्तम भोई यांच्यासारखे नागरिक उत्साहाने रांगेत उभे राहून आपला मतदानाचा हक्क बजावतात. ही विषमता डॉ. बाबासाहेबांनी दशके आधीच ओळखली होती लोकशाही टिकवायची असेल तर प्रत्येक नागरिकाचा सहभाग अनिवार्य आहे. आपल्या मतदारसंघात कोण उभा आहे यापेक्षा, मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे, ही जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. मतदान म्हणजे केवळ एक बटण दाबणे नव्हे; ते आपल्या संविधानाचा, आपल्या स्वातंत्र्याचा आणि आपल्या भविष्याचा सन्मान करणारी कृती आहे. पुढची पाच वर्षे लोकशाही कोणत्या हातात जाणार, हे आपल्या एका मताने ठरते. त्यामुळे मत देणे म्हणजे भविष्यासाठी घेतलेला सर्वात महत्त्वाचा निर्णय.
भारताची लोकशाही ही सामाजिक लोकशाहीचे प्रतिबिंब आहे. देशातील प्रत्येक नागरिक थेट राज्यकारभारावर चर्चा करू शकत नाही, म्हणूनच तो आपल्या प्रतिनिधींना विधिमंडळात पाठवतो. हे प्रतिनिधी जितके सक्षम आणि प्रामाणिक असतील, तितका देशाचा कारभार सुयोग्य रित्या चालेल. त्यामुळे मतदान करून योग्य लोकांना निवडणे ही लोकशाहीची पहिली अट आहे. मतदान न करणारे लोक आपल्या जबाबदारीबाबत उदासीन आहेत असेच म्हणावे लागेल. म्हणूनच निवडणुकीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यात येते. परंतु काहीजण सुट्टीचा फायदा घेत सहलीला जातात, पण मतदानासाठी पाच मिनिटे देत नाहीत. सहलीला जाण्यात काही चुकीचे नाही, पण त्यापूर्वी देशासाठी, समाजासाठी, स्वतःच्या भविष्यासाठी दिलेला एक मताचा क्षण अधिक पवित्र नाही का? निवडणूक आयोगाने मतदानाला उत्सवासारखे साजरे करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे, आणि उत्सवाची सुरुवात आपल्या एका मतानेच होते.
विसंगती अशी की भ्रष्ट, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांविषयी सर्वाधिक तक्रारी करणारी मंडळीच अनेकदा मतदानाला जात नाहीत.“चांगले लोक मतदान करत नाहीत, म्हणून वाईट लोक निवडून येतात” हे वाक्य अक्षरशः खरे ठरते. अशा लोकप्रतिनिधींचा भरणा रोखायचा असेल तर आपल्या संविधानाने आपल्याला एक भेदक अस्त्र दिले आहे मतदान. अमिष, दबाव, भेटवस्तू किंवा पैशाच्या मोहाला बळी न पडता, स्वच्छ लोकशाहीच्या रक्षणासाठी मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. कारण
मतदान करणे म्हणजे संविधानाचा सन्मान राखणे.
आणि हा सन्मान नवनाथ उत्तम भोई आणि त्यांच्या दृष्टीहीन मातेनं अत्यंत उत्साहात राखला. म्हणून हिंदी आणि उर्दूतील प्रसिद्ध शायर शकील आज़मी यांची शब्दरचना या प्रसंगाला अधिक गडद करते, हार हो जाती है जब मान लिया जाता है, जीत तब होती है जब ठान लिया जाता है, रणजितसिंह राजपूत,जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*रावल बी एड महाविद्यालयात एड्स दिन साजरा*
December, 03 2025
*डोळे अंधारात, पण पाऊल प्रकाशात !दिव्यांग मुलगा आणि दृष्टिहीन आईने उजळवला लोकशाहीचा दीप*
December, 03 2025
*कृष्ण औद्योगिक वसाहतीच्या शिवारात बिबट्याने तरुणावर केला हल्ला,परिसरात खळबळ*
December, 03 2025
*राकसवडे येथे मोफत संगणक वर्गाचे उद्घाटन*
December, 03 2025
*उपनगर व तळोदा हद्दीतील घरफोडीचे 2 गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश*
December, 03 2025

थोडक्यात बातमी

*रावल बी एड महाविद्यालयात एड्स दिन साजरा*
December, 03 2025
*डोळे अंधारात, पण पाऊल प्रकाशात !दिव्यांग मुलगा आणि दृष्टिहीन आईने उजळवला लोकशाहीचा दीप*
December, 03 2025
*कृष्ण औद्योगिक वसाहतीच्या शिवारात बिबट्याने तरुणावर केला हल्ला,परिसरात खळबळ*
December, 03 2025
*राकसवडे येथे मोफत संगणक वर्गाचे उद्घाटन*
December, 03 2025
*उपनगर व तळोदा हद्दीतील घरफोडीचे 2 गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश*
December, 03 2025

थोडक्यात बातमी

*रावल बी एड महाविद्यालयात एड्स दिन साजरा*
December, 03 2025
*डोळे अंधारात, पण पाऊल प्रकाशात !दिव्यांग मुलगा आणि दृष्टिहीन आईने उजळवला लोकशाहीचा दीप*
December, 03 2025

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज