*उपनगर व तळोदा हद्दीतील घरफोडीचे 2 गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*उपनगर व तळोदा हद्दीतील घरफोडीचे 2 गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश*
*उपनगर व तळोदा हद्दीतील घरफोडीचे 2 गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश*
नंदूरबार(प्रतिनिधी):-उपनगर पोलीस ठाणे हहितील फिर्यादी सुंदर मुकेशकुमार नाथानी, व्यवसाय व्यापार, रा. रा.जुनी सिंधी कॉलनी, लाडकाना वाडीचे पाठीमागे, जि. नंदुरबार यांचे मालकीच्या इलेक्ट्रीक साहित्याचे गोडावूनचे मागील खिडकीचे काच फोडुन अज्ञात इसमाने आत प्रवेश करुन फिर्यादी यांचे संमतीशिवाय लबाडीच्या इरादयाने विविध प्रकारचे एकुण 33,030 रुपये किमतीचे इलेक्ट्रीकल साहित्य चोरुन नेले म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथे 28 नोव्हेंबर 2025 रोजी गु.र.नं.312/2025 भा.न्या. संहिता कलम 305 (अ), 331(3) वगैरे प्रमाणे अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता, सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना 29 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वर नमुद चोरी ही हुडको कॉलनी व इंदिरा संकुल शेजारील भिलाटी परीसरातील काही मुलांनी केलेली आहे, अशी खात्रिशीर बातमी मिळालेवरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला खात्री करुन कारवाई कामी रवाना केले.
मिळालेल्या गोपनिय बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने उपनगर पोलीस ठाणे हद्दीत सदर इसमांचा शोध घेतला असता हुडको चौक येथे 3 विधीसंघर्षग्रस्त बालक मिळुन आले. त्यांना त्यांचे पालकांसमक्ष गुन्हयाबाबत विचारणा करता त्यांनी त्यांचे साथीदारांसह 3 ते 4 दिवसांपुर्वी रात्रीच्या वेळेस एका गोडाऊनचे मागील खिडकीचे काच फोडून चोरी केली असल्याची सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांनी सदर गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल हा हुडको कॉलनी परिसरातील एका काटेरी झुडुपामध्ये लपवुन ठेवलेला असल्याची माहिती दिली. त्याअन्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने हुडको कॉलनी परिसरातील एका काटेरी झुडूपाचे ठिकाणाहुन एकुण 25,925 रुपये किमतीचा इलेक्ट्रीकल साधनांचा मुद्देमाल हस्तगत केला,
त्याचप्रमाणे तळोदा पोलीस ठाणे हद्दितील दिपक कुंभार, वय 34 वर्षे, रा.डी.बी. हट्टी ता.तळोदा यांचे राहत्या घराचा बंद असलेल्या दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून एकुण 1,21,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरटयाने लबाडीच्या इरादयाने फिर्यादी यांचे संमतीशिवाय घरफोडी करुन चोरुन नेले म्हणुन तळोदा पोलीस ठाणे येथे अज्ञाताविरुध्द 24 नोव्हेंबर 2025 रोजी गु.र.नं.325/ 2025 भा.न्या. संहिता कलम 305 (अ), 331(4) वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वर नमुद चोरी ही नंदुरबार शहरातील सराईत आरोपी शरद ऊर्फ पवन गोंधळी याने त्याच्या साथीदारांसह केलेली आहे, अशी खात्रिशीर बातमी मिळालेवरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला खात्री करुन कारवाई कामी रवाना केले. मिळालेल्या गोपनिय बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने उपनगर पोलीस ठाणे हद्दीत सदर इसमांचा शोध घेतला असता नळवा रोडवरील एका हॉटेलजवळ दोन इसम मिळुन आले. त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे शरद ऊर्फ पवन अरुण चव्हाण (गोंधळी), वय 24 वर्षे, रा. एकता नगर, नंदुरबार, गुरुपालसिंग कप्तानसिंग शिकलीकर, वय 18 वर्षे, रा.एकता नगर, नंदुरबार असे सांगितले. त्यांना वर नमुद गुन्हयाबाबत माहिती विचारता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. तसेच गेला मुद्देमालापैकी त्यांचे ताब्यातुन रोख 4,110 रुपये रक्कम जप्त करण्यात आली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्रवण दत्त. एस. अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, तसेच पोहेकॉ दिनेश चित्ते, मुकेश तावडे, अजित गावीत, मनोज नाईक, सचिन वसावे, मोहन ढमढेरे, राकेश मोरे, विशाल नागरे, पोशि / अभय राजपुत, राजेंद्र काटके, आनंदा मराठे यांनी केली आहे.



