*जोगणी पाडा आश्रम शाळेत आयोजित राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जोगणी पाडा आश्रम शाळेत आयोजित राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन*
*जोगणी पाडा आश्रम शाळेत आयोजित राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नं.ता.वि समिती संचलित, अनु.प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा जोगणीपाडा ता.जि.नंदुरबार येथे 22 नोव्हेंबर 2025 वार शनिवार रोजी "राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा 2025" आयोजित करण्यात आली .
या परीक्षेत 135 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या परीक्षेचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये भूगोल विषयी आवड निर्माण करणे, भविष्याच्या दृष्टिकोनातून mpsc सारख्या स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणे परीक्षेच्या माध्यमातून आधुनिक युगात विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेबद्दल आत्मविश्वास वाढावा OMR शीट व बहुपर्यायी प्रश्न प्रकार याविषयी अनुभव येतो तसेच विद्यार्थ्यांमध्ये भूगोल विषयाची आवड निर्माण होऊन भूगोलाच्या इतर शाखेची देखील माहिती मिळून "भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेचा" विद्यार्थ्यांना फायदा होतो. परीक्षेला प्राचार्य व्ही.ए. पाटील व प्राथ. मुख्याध्यापक जे.वाय. पाटील सर व भूगोल प्रज्ञा शोध परीक्षा समन्वयक प्रा.श्री.किशोर राजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेत बसण्यासाठी प्रोत्साहन देऊन परीक्षेचे कामकाज पाहिले तसेच प्रा. जी. के.पाटील, प्रा. बी.आर.शिंपी प्रा. डी.ए.मगरे, डी एच. पाटील सर व सौ संगीता प्रभाकर वळवी यांनी पर्यवेक्षकांचे काम केलं.व कापडणे, तिजविज यांचे सहकार्य मिळाले.



