*वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा येथे राष्ट्रीय परिषदेची जय्यत तयारी सुरु*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा येथे राष्ट्रीय परिषदेची जय्यत तयारी सुरु*
*वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा येथे राष्ट्रीय परिषदेची जय्यत तयारी सुरु*
शहादा(प्रतिनिधी):-येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्ष व भौतिकशास्त्र विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम.उषा), नवी दिल्ली यांच्या अंतर्गत “ रिसेंट इंटरडिसीप्लीनरी अॅप्रोचेस इन सायन्स, ह्युम्यानीटीज, अग्रीकल्चर, इंजिनीअरिंग, लॉ व म्यानेजमेंट” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन 24 डिसेंबर 2025 बुधवार रोजी करण्यात आले आहे. या परिषदेत शास्त्रज्ञ- नॅनोटेक्नॉलॉजी, माजी प्राचार्य प्रताप कॉलेज, अमळनेर येथील प्रो. डॉ. एल. ए. पाटील, प्रा. डॉ. व्ही. ए. सोमाणी गुजरात विद्यापीठ यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नामवंत संशोधकांचे उद्भोधनपर व्याख्यान होणार असुन पेपर प्रेझेन्टेशन व स्कोपस सोर्स, वेब ऑफ सायन्स जर्नलमध्ये पेपर्स प्रकाशित केले जाणार आहेत. परिषदेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. परिषदेचे प्रमुख आयोजक कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुल शहादाचे, प्रशासकीय प्रमुख प्रा. डॉ. हिमांशू जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. राठोड असून संयोजक म्हणून पदार्थविज्ञान विषयाचे प्रमुख व आयक्यूएसी चे समन्वयक प्रा. डॉ. बी. वाय. बागुल असुन डॉ. डी. वाय. पाटील सचिव म्हणुन कार्य पाहणार आहेत. कार्यक्रमावेळी डॉ. के. एल. पाटील व कार्यालयीन अधिक्षक व्ही. डी. जाधव उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ तसेच राष्ट्रीय परिषदेच्या कार्यकारणीने प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी आणि विविध शेत्रातील अभ्यासकांना या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेत मोठ्या संखेने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.



