*मालाड रेल्वे स्थानक ते आप्पा पाडा रस्ता वाहतूक कोंडी मुक्त करा, समाजसेवक शरद बनसोडे यांची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मालाड रेल्वे स्थानक ते आप्पा पाडा रस्ता वाहतूक कोंडी मुक्त करा, समाजसेवक शरद बनसोडे यांची मागणी*
*मालाड रेल्वे स्थानक ते आप्पा पाडा रस्ता वाहतूक कोंडी मुक्त करा, समाजसेवक शरद बनसोडे यांची मागणी*
मुंबई(प्रतिनिधी):-मालाड पूर्व येथील मालाड रेल्वे स्थानक ते आप्पा पाडा परिसरातील रस्ता कायमस्वरूपी वाहतूक कोंडी मुक्त करावा अशी मागणी शरद बनसोडे यांनी केली आहे पूर्व विभागातील शिवाजीनगर जय भीम नगर, रमेश हॉटेल ओमकार सोसायटी आधी झोपडपट्टी विभागात जाण्यायेण्यासाठी एकमेव रिक्षा सेवा उपलब्ध आहे या मार्गावर रस्ते अरुंद असल्यामुळे सकाळ संध्याकाळच्या वेळेमध्ये नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागतो. सदर रस्ता अरुंद असल्यामुळे मालवाहतूक करणारे ट्रक टेम्पो डंपर यांची वर्दळ कायम चालू असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या आणखीन वाढत जाते
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अवजड वाहने उदाहरणार्थ ट्रक टेम्पो डंपर याच्यावरती बंदी घालण्यात यावी त्याचप्रमाणे अवजड वाहनांच्या टायमिंगमध्ये फेरबदल करण्यात यावा त्यांना एक दुपारची वेळ देण्यात यावी 11 ते 4 त्यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही आणि कामावरती जाणाऱ्या लोकांना आणि कामावरून घरी येणाऱ्या लोकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही याची दखल घेण्यात यावी. तसेच सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोटरसायकल पार्किंग आणि इतर गाड्या तसेच फळ भाजीपाला विकणारे भाजी विक्रेते यांचाही मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास सहन करावा लागतो. याकडे वाहतूक पोलीस स्थानिक पोलीस प्रशासन, मुंबई महानगरपालिका अतिक्रमण खाते यांनी मालाडकरांना भेडसावणाऱ्या या वाहतूकीच्या गंभीर समस्ये कडे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शरद नामदेव बनसोडे यांनी केली आहे.



