*के. आर. पब्लिक स्कुल मध्ये श्रीमद् भगवत गीता जयंती साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के. आर. पब्लिक स्कुल मध्ये श्रीमद् भगवत गीता जयंती साजरी*
*के. आर. पब्लिक स्कुल मध्ये श्रीमद् भगवत गीता जयंती साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के. आर. पब्लिक स्कुल नंदुरबार येथे श्रीमद् भगवत गीता जयंती साजरी करण्यात आली. शाळेच्या प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांनी श्रीकृष्णाची प्रतिमा आणि श्रीमद् भगवत गीता ग्रंथाचे मनोभावे पूजन केले. तद्नंतर कार्यक्रमास सुरवात झाली. अध्याय वाचन, अर्जुन, श्रीकृष्ण संवादात्मक नाटक, तसेच गीता ग्रंथ या विषयी माहिती सांगितली. तसेच इस्कॉनचे संत माधव सेवादास आणि शाश्वत क्रिष्णादास यांनी भजन किर्तन करीत वातावरण भक्तीमय केले होते. शाळेतील शिक्षक सतिश बागुल व करण शर्मा यांनी आपले विचार व्यक्त केले. संस्थेचे चेअरमन किशोर वाणी यांनी श्रीमद् भगवत गीता जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.



