*राजापूर तालुक्यातील धामणपे येथे आज पासून तीन दिवस दत्तजयंती उत्सव*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजापूर तालुक्यातील धामणपे येथे आज पासून तीन दिवस दत्तजयंती उत्सव*
*राजापूर तालुक्यातील धामणपे येथे आज पासून तीन दिवस दत्तजयंती उत्सव*
राजापुर(प्रतिनिधी):. तालुक्यातील धामणपे गावी श्री दत्तगुरु सेवा मंडळा तर्फे दत्त जयंती निमित्त 3 ते 5 डिसेंबर या तीन दिवसाच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आह 3 डिसेंबर रोजी मर्यादित षटका़चे ओव्हर आर्म क्रिकेट सामने ठेवण्यात आले आहेत. 4 डिसेंबरला होम हवन, मुर्ती अभिषेक, भव्य पालखी शोभा यात्रा, महाप्रसाद व रात्री ठिक 10 वा झर्ये येथील बाळकृष्ण पांचाळ बुवा यांच्या श्री अदिष्टी सत्यनारायण भजन मंडळाचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम होणार आहे. 5 डिसेबर रोजी महिलांसाठी हळदिकुंकु,नवसाची गाऱ्हाणी व रात्री फुलोरा प्रस्तुत प्रसाद पंगेरकर लिखित व दिग्दर्शित फुर्वज हे दोन अंकी नाटक सादर होणार आहे. धामणपे गावच्या या दत्त जयंती उत्सवाचं हे 36 वर्ष आहे. अख़डीतपणे श्री दत्तगुरु सेवा मंडळाचा दत्त जयंती उत्सव उत्साहात साजरा होतो. त्या निमित्ताने संपुर्ण गाव भक्तीमय होउन जातो, माहेरवाशीनी या निमित्ताने आवर्जून माहेरी येतात असे उत्सव मंडळाचे अध्यक्ष दिपक राणे यांनी सांगितले.



