*रावल बी एड महाविद्यालयात एड्स दिन साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रावल बी एड महाविद्यालयात एड्स दिन साजरा*
*रावल बी एड महाविद्यालयात एड्स दिन साजरा*
दोंडाईचा(प्रतिनिधी):-धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील श्रीमंत राजे दौलतसिंह रावल बीएड महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, आयसीटीसी विभाग उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा व रेड रीबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनाचे आयोजन करण्यात आलेले होते, या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथे प्राचार्य प्रमोद डी बोरसे, उपजिल्हा रुग्णालयातील कार्यक्रम प्रमुख योगेश पवार व धीरज दोडे, सर्व प्राध्यापक व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, मान्यवरांच्या स्वागतानंतर जागतिक एड्स दिनानिमित्ताने सर्व विद्यार्थ्यांकडून सामूहिक शपथ वदवुन घेण्यात आली, एड्स शपथेचे वाचन योगेश पवार यांनी केले, त्यानंतर सामूहिक रॅलीचे आयोजन करण्यात आले, तत्पूर्वी प्रभात फेरीमध्ये द्यावयाच्या विविध घोषणांविषयीचे मार्गदर्शन धीरज दोडे यांनी केले, त्यानंतर दोंडाईचा शहरात सामूहिक प्रभात फेरी काढण्यात आली, यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषणा दिल्या, प्रभात फेरी पुन्हा रुग्णालयात परत आल्यानंतर तेथे योगेश पवार व धीरज दोडे यांनी एड्स विषयी सर्वसाधारण माहिती दिली व आभार अभिव्यक्तीनंतर कार्यक्रमाची सांगता झाली, या उपक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व अनेक विद्यार्थी उपस्थित होते,
कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद डी बोरसे यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक एमएस उभाळे, प्राध्यापक रवींद्र पाटील, निशा ठाकूर, रेवती बागुल, सुनीता वळवी यांनी प्रयत्न केले, तर प्रशासकीय सेवक शंकर गिरासे, कृष्णा बागुल, अमर राजपूत व वीरपाल गिरासे सहकार्य केले.



