*कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम 2025 साठी ‘पीकस्पर्धा’ जाहीर- सी. के. ठाकरे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम 2025 साठी ‘पीकस्पर्धा’ जाहीर- सी. के. ठाकरे*
*कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम 2025 साठी ‘पीकस्पर्धा’ जाहीर- सी. के. ठाकरे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम 2025 साठी राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर पीकस्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सी. के. ठाकरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. रब्बी हंगाम 2025 मध्ये सर्वसाधारण आणि आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस या पिकांसाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे. सहभागासाठी पात्रता निकष,
शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे आणि ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे.
शेतकरी एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेऊ शकतो. सहभागी शेतकऱ्याच्या स्वतःच्या शेतात त्या पिकाखाली किमान 40 आर) क्षेत्रावर लागवड असणे आवश्यक आहे. प्रवेश शुल्क आणि अंतिम तारीख,
सर्वसाधारण गटासाठी: रुपये 300 तर आदिवासी गटासाठी: रुपये 150 राहील. ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर, 2025 आहे. आवश्यक कागदपत्रे,
पीकस्पर्धेत भाग घेण्यासाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे: विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ).
ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन. 7/12 आणि 8-अ चा उतारा. जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास). संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा. बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, बक्षिसांचे स्वरूप (सर्वसाधारण व आदिवासी गट),
पीकस्पर्धेचा निकाल तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते निवडण्यात येतील. तालुका पातळीवर पहिले बक्षिस रुपये 5 हजार, दुसरे रुपये 3 हजार व तिसरे रुपये 2 हजार. जिल्हा पातळीवर पहिले बक्षिस रुपये 10 हजार, दुसरे रुपये 7 हजार व तिसरे रुपये 5 हजार तर राज्य पातळीवर पहिले बक्षिस रुपये 50 हजार, दुसरे रुपये 40 हजार व तिसरे रुपये 30 हजार असे बक्षिसाचे स्वरुप आहे. अधिक माहितीसाठी शेतकरी बांधवांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे संकेतस्थळ http://krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी. राज्याच्या एकूण कृषि उत्पादनात भर घालण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या मनोबलात वाढ होऊन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी, कृषी विभागामार्फत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पीक स्पर्धेत सहभागी व्हावे असेही आवाहन तालुका कृषि अधिकारी ठाकरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



