*निवड चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध -पी. आर. कोसे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*निवड चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध -पी. आर. कोसे*
*निवड चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध -पी. आर. कोसे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नवापूर तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालय, श्रावणी येथील सन 2025- 26 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी आयोजित निवड चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, त्यांनी त्वरित प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावे, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य पी. आर. कोसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2026 दि. 13 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता आयोजित करण्यात आली असून प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत www.navodaya.gov.in किंवा cbseitms.rcil.gov.in संकेतस्थळांना भेट द्यावी प्रवेशपत्र डाउनलोड प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांचा नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि जन्मतारीख (Date of Birth) आवश्यक आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट काढणे अनिवार्य आहे. प्रवेशपत्रावरील नाव, फोटो, परीक्षा केंद्राचा पत्ता, परीक्षा वेळ इत्यादी सर्व तपशील काळजीपूर्वक तपासावा. परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्रासोबत आवश्यक ओळखपत्र देखील बाळगणे आवश्यक आहे. सर्व उमेदवारांनी या सूचनेची नोंद घेऊन वेळेवर प्रवेशपत्र डाउनलोड करावे आणि परीक्षेसाठी उपस्थित राहावे, असेही कोसे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



